रामटेक :- कविकुलगुरु इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलाजी ॲन्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये इंजिनिअरिंग व आर्किटेक्चरच्या प्रथम ओटोनोमस बॅचच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याकरीता २३ सप्टेंबरला इंडक्शन कम ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन किट्सच्या सिल्व्हर जुबली सभागृहात विद्यार्थी व पालक यांचा करिता करण्यात आले.
कार्यक्रमाची अध्यक्षता संस्था सचिव व्ही. श्रीनिवासराव यांनी केली. या वेळी प्रामुख्याने प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे,सिविल विभाग व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनंत दाभाडे, प्रथम वर्षाच्या विभागाचे प्रमुख डॉ. के. गजानन, तसेच इतर विभाग प्रमुख, प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संखेत उपस्थित होते.
संस्था सचिव व्ही. श्रीनिवासराव म्हणाले की किट्सला नॅक ‘ए’ दर्जा व यूसीजी ऑटोनॉमस चा दर्जा मिळाला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीने संस्था प्रयत्न करीत आहे. जेणे करून जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडतील. ते म्हणाले की विद्यार्थ्यानी रोल मॉडेल बनावे व समाजाची सेवा करावी.
प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून संस्थेच्या प्रगतीची व तसेच कॉलेज मधील विविध विभागाची माहिती दिली. ते म्हणाले की संस्थेला ऑटोनॉमस दर्जा मिळाल्याने संस्था इंडस्ट्रीच्या मागणी नुसार अभ्यासक्रमात फेरबदल करू करेल. त्यामुळे विद्यार्थाना नामांकित कंपन्या मधे रोजगार उपलब्ध होईल. तसेच विद्यार्थ्यांना करीअर विषयक मार्गदर्शन केले.
संचालन प्रा. योगीराज बकाले व प्रा. राशी श्रीगडीवार तर आभार डॉ. अनंत दाभाडे यांनी केले.