कन्हान-पिपरी नगरपरिषद सामोर साखळी उपोषणाचा तिसरा दिवस  

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी

– गोंडवाना संघर्ष समिती कन्हान व सामाजिक युवा संघटना व्दारे जाहीर समर्थन. 

कन्हान (नागपुर) : – शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हिंदुस्थान लिव्हर कंपनीची जमीन विक्री झाल्याने कन्हान शहराच्या विकासा वर आणि मुलभुत सुविधा पुर्ण करण्यावर प्रश्न निर्माण झाल्याने ही जागा शासनाने कन्हान शहराच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्यास खरेदी करावी यास्तव सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाच्या वतीने कन्हान-पिपरी नगरपरिषदे सामोर साखळी उपोषण माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतुत्वात सुरू करून तिस-या दिवसी युवा क्रांती संघटन कन्हान व्दारे उपोषण करण्यात आले.          कित्येक वर्षापासुन अनेक राजकीय व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जमिन शासनाने विकत घेऊन गुजरी बाजार, आठवडी बाजार, दुकानाचे गाळे, हॉकर्स झोन, मार्केट यार्ड, भाजीपाला दुकानदार, बस स्टैंड आणि शहराच्या सर्वांगिण विकासाकरिता उपयोगात घेण्याची मागणी केली होती. परंतु नगरपरिषद प्रशासनाने सदर विषया कडे गांभीर्याने लक्ष केंन्द्रीत न केल्याने कन्हान येथील हिंदुस्थान लीव्हर लीमिटेड संपुर्ण १८.७८ एकर जागा ही खाजगी ग्रोमोर वेंचर ग्रुपने खरेदी करण्यात आल्याने कन्हान शहराचा मुलभुत गरजा पुर्ण करण्यास अत्यंत आवश्यक असल्याने शहरात आता दुसरी कुठलिही जागा नसल्याने शहराच्या सर्वांगीण विकासावर प्रश्न निर्माण झाला आहे. कित्येक वर्षापासुन शहरात रिकामी जागा नसल्याने राष्ट्रीय चार पदरी महामार्गावर फुटपाथ, गुजरी आणि आठवडी बाजार भरत असल्याने नागरिकांना व दुकानदाराना जिव मुठीत घेऊन सामानाची खरेदी विक्री करावी लागत आहे. यास्तव विविध संघटने द्वारे अनेकदा नगरपरिषद प्रशासना ला निवेदन देऊन ही प्रशासन झोपेतुन जागा न झाल्याने गुरूवार (दि.२२) डिसेंबर ला नगरपरिषद सामोर माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे नेतुत्वात साखळी उपोषण सुरू करण्यात आले. शनिवार (दि.२४) डिसेंबर ला तिस-या दिवसी युवा क्रांती संघटन कन्हान अध्यक्ष अभिजीत चांदुरकर, सदस्य ज्ञानेश्वर दारोडे, नीलेश गाढ़वे, धर्मेंद्र गणविर, केतन भिवगडे यांचेद्वारे उपोषण करण्यात येत आहे. उपोषण स्थळी दणका युवा संघटनचे योगेश वाड़ीभस्मे, गोंडवाना संघर्ष समिती कन्हान अध्यक्ष अनिल  पंधराम , शंकर इनवाते, संदीप परते, प्रकाश मड़ावी, अंनतराम टेकाम, राजविर मड़ावी, शिवा कुर्वे, राहुल टेकाम हयानी साकळी उपोषणाला भेट देत पाठिंबा जाहीर केला आहे. याप्रसंगी प्रामुख्याने नगरपरिषद गटनेता राजेंद्र शेंदरे, रिंकेश चवरे, शैलेश शेळके, प्रदीप बावने, अद्रीराम कनोजिया, लिलाधर बर्वे, देवा तेलोते, मयुर माटे, महेश धोगड़े, सुरेश कळंबे, शैलेश कड़बे, प्रशिल सुख देवे, नितेश बुराडे, चिराल वैद्य, फिरोज शेख, प्रशांत पाटील, शैलेश दिवे, प्रदीप गायकवाड, सुरज उके, ऋृषभ बावनकर, मनोहर तिवाडे सह विविध पक्षाच्या व संघटनेच्या १२५ च्या वर मान्यवर नागरिकानी भेट देऊन शहराच्या सर्वागिण विकासा करिता मागणी असल्याने समर्थन दिले आहे. तसेच सामाजिक युवा संघटना महाराष्ट्र व्दारे सुध्दा समर्थन जाहीर करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शाश्वत विकासासाठी आदिवासींच्या क्षमता अभ्यासा - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Sun Dec 25 , 2022
‘आदिवासी विकास, पूर्वनिरीक्षण आणि पुढचा मार्ग’ या विषयावरील कुलगुरू संमेलन नागपूर : आदिवासी घटकांमधे खुप क्षमता आहेत त्यांचा वापर करून शाश्वत विकास साधण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नागपूर येथे कुलगुरूंना दिल्या. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवशीय ‘आदिवासी विकास, पूर्वनिरीक्षण आणि पुढचा मार्ग’ या विषयावरील कुलगुरूंच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com