संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– भाजपा ने किया विरोध
कामठी :- स्थानीय गौतम नगर जूनी छावनी परिसरात नगर परिषद द्वारा जलापूर्ति होत नाही तरी सुद्धा नगर परिषद द्वारा जलापूर्ति बिल वसुलण्यात येत आहेत याचा विरोधात भाजपा शहर महामंत्री उज्ज्वल रायबोले यांच्या नेतृत्व मधे पाणी पुरवठा अधिकारी अवि चौधरी यांना आज शुक्रवारी दुपारी निवेदन देण्यात आले
गौतम नगरात नगर परिषदद्वारा पाईपलाईन टाकण्यात आली परंतु प्रेशर नसल्याने पाईपलाईन शो पीस बनली आहे , त्या मुळे गौतम नगरात जवळपास प्रत्येक दुसऱ्या घरी बोरिंग करण्यात आली आहे .
स्थानीय निवासी आशा सुनील पौनिकर, शारदा पंजाबराव मेश्राम यांनी पाणी पूरवठा होत नसल्याने 2013 मधेच लिखित पत्र देउन जलापूर्ति बंद करण्याची मागणी केली होती परंतु त्यांना आता पाणी बिल हेतु डिमांड पाठविण्यात येत आहे ते चुकीचे आहे गौतम नगरच्या शेकडो रहिवाशानी केली आहे.उज्ज्वल रायबोले यांनी नगर परिषदला या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे