महामार्गावर मोकाट जनावरांच्या वावरामुळे अपघाताचे प्रमाणात वाढ झाली असून मोकाट जनावरांच्या मालकांवर केली जाणार कारवाई

नागपूर :- ग्रामीण हद्दीत महामार्गावर मोकाट जनावरांच्या कळपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असुन त्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. सदर बाबीची दखल मा. पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्री. हर्ष ए. पोद्दार यांनी घेतली असुन ज्या मालकांची जनावरे रस्त्यावर मोकाट फिरत असतील अशा जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. नागपूर ग्रामीण पोलीसांनी रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या सत्यावरील मोकाट जनावरांच्या मालकावर कारवाई केली. यामध्ये पोस्टे रामटेक अंतर्गत एकुण ०४ जनावरांचे मालकांवर तसेच पोस्टे कन्हान अंतर्गत ०१ असे एकुण ०५ जनावरांच्या मालकांवर महाराष्ट्र पोलीस कायदा १००, १०६, १०७ अन्वये कारवाई करण्यात आली.

सदर कार्यवाही ही पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए पोहार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे रामटेक येथील ठाणेदार पोनि प्रशांत काळे, पोस्टे कन्हान येथील ठाणेदार पोनि राजेंद्र पाटील यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तलवारीने केक कापणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद

Sat Sep 21 , 2024
पारशिवनी :- पो.स्टे. पारशिवनी हद्दीतील पातीमाता मंदिराचे मागे, खारी पारशिवनी येथील राहणारे नंदकिशोर आनंदराव मस्के याचा दिनांक १४/०९/२०२४ रोजी वाढदिवस असल्याने वाढदिवसाचे अनुषंगाने ठेवलेल्या कार्यक्रमात नंदकिशोर आनंदराव मस्के व त्याचा भाऊ गौरव आनंदराव मस्के या दोघांनी एका मोठ्या लोखंडी तलवारीने केक कापले व त्याचा मोबाईलवर व्हीडीओ तयार करून घेऊन तो व्हीडीओ WhatsApp Status वर ठेवले होते, असे निदर्शनास आल्याने पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com