..तर भाजपला ऐवढे नेते बोलाविण्याची गरज पडली नसतीः विकास ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर टोला

– ठाकरेंनी जन आशीर्वाद यात्रेद्वारे सोमवारी पिंजून काढले दक्षिण नागपूर

नागपूर :- लोकसभा निवडणूकीत मी प्रचार करणार नाही, चहा पाजणार नाही, बॅनर लावणार नाही, अशी भाषा करणाऱ्या नेत्यांना नागपूरच्या जनतेने घाम फोडले आहे. भाजपने फुगवलेल्या आभासी विकासाचा फुगा जनतेसमोर फुटला आहे. नागरिकांना भेटण्यासाठी जाणाऱ्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना नागरिकांकडून बेरोजगारी, महागाईवर प्रश्न विचारण्यात येत आहे. याचे उत्तर नसल्याने भाजप नेत्यांना नागपुरात प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह डझनभर केंद्रीय मंत्र्यांची गरज पडत आहे. त्यावरुन नागपूर लोकसभा निवडणूकीबद्दलची भाजपच्या मनातील भिती दिसून असल्याचा घणाघात इंडीया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी लागावला. बीबीसी या वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

पुढे ठाकरे म्हणाले, “पिण्याचे स्वच्छ पाणी, अद्यावत आरोग्य केंद्र, दर्जेदार शिक्षण आदी मुलभूत सुविधा पुरविण्यात सत्ताधारी भाजप अपयशी ठरला आहे. ही लोकसभेची निवडणूक मी लढवत नसून नागपूरची जनता लढत आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान गल्लोगल्ली नागरिक उत्स्फूर्तपणे भेटून आपला पाठिंबा दर्शवत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना शहरात प्रचारासाठी फिरणेही नागरिकांनी कठीन करुन सोडले आहे. म्हणूनच देशात विकासाचा डंका पिटणाऱ्यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ, आणि केंद्रीय मंत्र्यांना प्रचारासाठी नागपुरात बोलवावे लागत आहे.”

शहरातील तापमानासह लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा पाराही शहरात वाढला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता नागपूरच्या दक्षिण-पश्चिममध्ये उंटखाना चौक येथून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर पीटीएस क्वॉर्टर, बास्केटबॉल ग्राऊंड, महेश कॉलनी, वकील पेठ, क्रीडा चौक, सोमवारी क्वॉर्टर मार्गे, गांधी विद्यामंदीर, मंगलमूर्ती चौक, नेहरुनगर चरडे गल्ली मार्गे रेशिमबागमध्ये डॉ. रविंद्र भोयर यांच्या घरी रॅलीचा समारोप झाला. जन आशीर्वाद यात्रेत प्रामुख्याने आमदार अभिजीत वंजारी, गिरीश पांडव, शेखर सावरबांधे, विशाल मुत्तेमवार, अशोक धवड, राजा तिडके, उमेश डांगे, सुजाता कोंबाडे, गुड्डू तिवारी, छोटू भोयर यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी, आमदार अॅड. अभिजित वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाटतरोडी, चंद्रमणीनगर आणि कुंभार टोली येथे तीन जनसभेचे आयोजन करण्यात आले होते.

तरुणाचा फोन अन् ठाकरे रात्री दोन वाजता पोहोचले मानकापूर चौकात

मानकापूर चौकात रविवारी रात्री घडलेल्या भिषण अपघातात तब्बल १०-१२ चार चाकी वाहनांचे अपघात अनियंत्रीत ट्रकमुळे झाले. घटना घडताच जन आशीर्वाद यात्रेत विकास ठाकरे यांना भेटणाऱ्या नागरिकाने विकास ठाकरे यांना फोन केला. तसेच अपघाताबद्दल सांगितले. यावेळी ठाकरे सकाळी ६ वाजता पासून नागरिकांना भेटून रात्रीची सभा आटोपून बैठकीत असतानाच परत रात्री दोन वाजता मानकापूर चौकात पोहोचले. तसेच नागरिकांची विचारपूस केली. तसेच पोलिसांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेत योग्य कारवाईची सूचना केली. आपण नागरिकांसाठी 24×7 उपलब्ध आहे, असे विकास ठाकरे आपल्या जन आशीर्वाद यात्रेत सांगत असतात. मात्र खरंच ते उपलब्ध असतात याचा अनुभव आम्हाला आला असल्याचे मानकापूर येथील नागरिकांनी सांगितले.

आज उत्तर नागपुरात जन आशीर्वाद यात्रा, तीन जाहीर सभा

मंगळवारी (ता. ९ एप्रिल) रोजी सकाळी आठ वाजता उत्तर नागपुरातील क्लार्क टाऊन येथून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात होईल. नझुल लेआऊट-अंगुलीमान बुद्ध विहार – आंबेडकर नगर-लाल शाळा-इंदोरा मोठा बुद्ध विहार-जुनी ठवरे कॉलनी- आवळेनगर-कामगार नगर चौक-कपिल नगर-बाबादिपसिंग नगर -समतानगर-आर्यनगर-जागृतीनगर-इंदियानगर-मार्टिंन कॉलनी-कस्तुरबा नगर-जरीपटका बाजार मेनरोड मार्गे जिंजर मॉल येथे यात्रेचे समारोप होईल. यानंतर सायंकाळी सात वाजता मध्य नागपुरातील भुलेश्वरनगर, पूर्व नागपुरातील जयभीम चौक हिवरीनगर आणि उत्तर नागपुरातील भिम चौक, नारा रोड येथे जाहीर सभा होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात

Tue Apr 9 , 2024
– तीन उमेदवारांची माघार – उमेदवारांना चिन्ह वाटप यवतमाळ :- यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 3 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे एकून 17 उमेदवार आता निवडणूक रिंगणात राहीले आहे. रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हांचे देखील वाटप करण्यात आले. उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये कुणाल कृष्णराव जानकर, रामराम सवाई पवार व वैशाली संजय देशमुख यांचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com