संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि कामठी खुली कोळसा खदान येथुन लोखंडी वजना ची कोणी तरी अज्ञात चोरट्यांने चोरू केल्याने कन्हान पोलीसां नी वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे च्या तक्रा रीवरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.
वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे वय ४४ वर्ष राह. चनकापुर कॉलोनी खापरखेडा हे वे कोलि खुली कोशसा खदान कामठी उपक्षेत्र येथे प्रभा री सुरक्षा अधिकारी असुन नोकरी करत असुन त्यांची ड्युटी सकाळी वेळ ९ ते ५ वाजता पर्यंत असते. शनि वार (दि.६) ऑगस्ट ला रामदास कंडे हे रोज प्रमाणे सकाळी ८ वाजता आपल्या कर्तव्यावर वेकोलि काम ठी उपक्षेत्र येथे पोहेचले असता तेथील सुरक्षा विभाग स्टोर रूम चे कुलुप लावलेला दिसले नाही. शुक्रवार ( दि.५) ऑगस्ट चे रात्री १२ वाजता पासुन ते शनिवार (दि.६) चे सकाळी ८वाजता पर्यंत सुरक्षा रक्षक अमित बाबुराव बेलखुरे राह. शिवनगर कन्हान हे डयुटी होते. स्टोर रूम चे कुलूप बाबद रामदास कंडे यांनी त्यास विचारले असता त्यांनी सांगितले की या बाबत मला माहीती नाही. तेव्हा रामदास कंडे यांनी स्टोर रूम मध्ये आत जावुन पाहीले असता लोखंडी वजन प्रती नग २० किलो प्रमाने ७ नग किंमत प्रती नग १२०० रूपये प्रमाणे असा एकुण ८४०० रूपयाचा मुद्देमाल कोणी तरी अज्ञात चोरट्यांने स्टोर रूम चे कुलूप तोडुन चोरी केल्याने कन्हान पोलीसांनी सुरक्षा अधिकारी रामदास कंडे यांचा तक्रारीवरून पोस्टे कन्हान ला अज्ञात चोरट या विरुद्ध अप.क्र ४७२/२०२२ कलम ३८०, ४६१ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गद र्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.