संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर डुमरी जवळ नवनिर्माण पेट्रोल पंप वरील लोखंडी ८० जेक पाईप व ९ स्पेन असा एकुण ४४५०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरटयानी चोरी केल्याने कन्हान पोलीसानी अज्ञात आरोपी विरूध्द चोरी चा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
रमेशकुमार नरेंद्र चव्हाण वय ३२ वर्ष रा. सालय कोसमी तहसिल बरघाट जिल्हा सिवनी हल्ली रा. म्हाळगीनगर अंकित माठे नेहरू नगर नागपुर हे ४ वर्षा पासुन सिव्हिल कामाचे कंत्राटदारी काम करित असुन सध्या ६ महिन्या पासुन मित्र शुभम सुरेश मानोटी वय २६ वर्ष रा. म्हाळगीनगर नागपुर दोघेही नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर डुमरी जवळ नवनिर्माण पेट्रोल पंपचे निर्माण काम करित असुन हे काम करण्याकरिता त्यानी लोखंडी जेक पाईप १० फुट लांब १०० पाईप व लोखंडी १० स्पेन घटनास्थळी आणले होते. कामाच्या स्थळी देखरेख करण्यास पपु डुबरे यास चौकीदार म्हणुन ठेवलेला आहे. मंगळवार (दि.८) ऑगस्ट ला डुमरी साईड वरील चौकीदार पपु डुबरे यांनी रात्री १० वाजता फोन करून सांगितले की, नवनिर्माण पंप वर ठेवलेले जेक पाईप व स्पेन चोरी झाले आहे. रमेशकुमार चव्हाण हयानी (दि.६) ऑगस्ट ला रात्री ८ वाजता सामान पाहिले तर बरोबर होते. बुधवार (दि.९) ऑगस्ट ला सकाळी ११ वाजता नागपुर वरून डुमरी साईड वर येऊन बघितले असता लोखंडी १० फुट चे ८० जेक पाईप प्रति नग ५०० रूपये व १० फुटा चे ९ लोखंडी स्पेन प्रति नग ५०० रूपये असे एकुण ४४५०० रूपयाचे मुद्देमाल चोरटयाने चोरी केल्याने चौकीदारास विचारले तर त्यानी झोपलो असल्याचे सांगितले. कन्हान पोलीसा नी फिर्यादी रमेशकुमार चव्हाण यांचे तक्रारीवरून पो स्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु करून आरोपीचा शोध घेत आहे.