संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नंबर तीन जिल्हा परिषद शाळे जवळुन दोन आरोपींनी दगडी कोळसा व मारूती सुजुकी सह एकुण ६७,४४० रु. मुद्देमाल चोरून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१०) ऑक्टों बर ला वेकोलि सुरक्षा रक्षक दुपारी सेकंड शिफ्ट ४ ते १२ वाजता सेराजुद्दीन मोहम्मदीन अंसारी वय २५ वर्ष खदान नं.३ कन्हान हे पेट्रोलिंग ड्युटी करीत असतांना १) नाहीदबाबु सैय्यद वय २७ वर्ष राह.वार्ड क्र. ४ शिव नगर कांद्री कन्हान, २) सोहेल अब्दुल खान वय २१ वर्ष राह. खदान नं.३ कन्हान यांनी संगमत करून एम एच ४०/ सी.डी – ३४३९ क्रमांकाच्या बोलोरो गाडी मधील दगडी कोळसा मारूती सुजुकी ८०० गाडी क्र. एम एच ०६/ ए बी ३२२६ या मध्ये ९३० किलो दगडी कोळसा किंमत ७४४० रू. व मारूती सुजुकी किंमत ६०,००० रू असा एकुण ६७,४४० रूपयांचा मुद्देमाल दोन आरोपींनी चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी वेकोलि सुरक्षा रक्षक सेराजुद्दीन मोहम्मद्दीन अंसारी यांचा तक्रारीने पोस्टे कन्हान ला आरोपी १) नाहीद बाबु सैय्यद, २) सोहेल अब्दुल खान यांचा विरुद्ध अप क्र ५९०/२२ कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जयलाल सहारे हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.