हत्तींच्या हल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना आथीक मदत द्यावी…

अमरदिप बडगे,प्रतिनिधी

शेतीचे नुकसान सह अनेक मागण्यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीने दिले प्रशासनाला निवेदन

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील तिडका/ येरंडी जंगल परिसरात हत्तींच्या हल्यात मृत्यू झालेल्या परिवाराला मदत देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केले आहे.

तिडका येरंडी जंगल परिसरात हत्तींच्या हल्यात सुरेन्द्र कळईबाग ५२ वर्ष यांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे त्यांच्या परिवाराला 20 लाखांची आर्थिक मदत, हत्तिमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 60 हजार तर रानडुक्करमुळे शेती नुकसानीचे पंचनामे अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दिलीप बन्सोड सह काँगेस कार्यकारणी यांनी वनविभाग अधिकारी, सुधीर मुनगंटीवार वनमंत्री व पालकमंत्री यांच्या नावे निवेदन दिले आहे. यावर आता प्रशासन शेतक-यांची काय मदत करेल याकडे शेतक-यांचे लक्ष राहील.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com