मौदा :- अंतर्गत १३ किमी अंतरावर मौजा उमरी परसाड येथे दिनांक २०/१२/२०२३ चे २३.१० वा. ते दिनांक २१/१२/२०२३ चे १०.३० वा. दरम्यान फिर्यादी नामे शेषराव निलकंठ तितरमारे, वय ३८ वर्ष, रा. बडोदा ता. कामठी हा आपले कार्यालयात काम करित असताना फिर्यादीला फोनद्वारे माहिती मिळाली कि, मौजा पलसाड उमरी रोड शिवारातील कृषी पंपांना विज पुरवठा करणारे लघुदाब वाहीनीचे १५ ईलेक्ट्रीक पोल वरील अॅल्युमीनिअम तार कोणीतरी अज्ञात चोगने कापुन चोरून नेले आहे. सदर लघुदाब वाहिनीतील २ कि.मी तार किंमती ५५,०००/-रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन मौदा येथे अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३७९ भादंवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार यंगलवार हे करीत आहे.