राष्ट्रीय सफाई मजदुर कॉग्रेस नगरपरिषद कन्हानची कार्यकारणी घोषित

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- राष्ट्रीय सफाई मजदुर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महामंत्री गणेश नुन्हारे व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष जयंत सारवान हयानी नगरपरिषद कन्हान-पिपरी येथील स्थाई व अस्थाई सफाई मजदुरांची बैठक घेऊन नवनियुक्त कार्यकारणी घोषित करून कन्हान नगराध्यक्षा करूणा आष्टनकर हयाना भेटुन स्थाई व अस्थाई मजदुरांना न्याय देत सहकार्य करण्याची मागणी संघटनाव्दारे करण्यात आली.

बुधवार (दि.१९) ऑक्टोंबरला नगरपरिषद कन्हान-पिपरी येथे राष्ट्रीय सफाई मजदुर काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री  गणेश नुन्हारे व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष जयंत सारवान हयाच्या प्रमुख उपस्थित स्थाई व अस्थाई सफाई मजदुरांची बैठक संपन्न झाली. यात राष्ट्रीय सफाई मजदुर काँग्रेस नगर परिषद कन्हान अध्यक्ष अनिल भौगरे, कार्याध्यक्ष अकेंश टेंभुर्णे, उपाध्यक्ष बबीता चौहान, उपाध्यक्ष मनोज मधुमटके, सचिव महेश बढेल, सह सचिव साद्दिसा नागदेवे, संगठक अजय हातागडे, लता सोलंकी, कार्य कारणी सदस्य पंकज जुगेल, ओमप्रकाश परिहार, महादेव खोब्रागडे आदीची नियुक्ती करून कार्यकारणी घोषित करून नवनियुक्त पदाधिका-यांचे पुष्पगुच्छाने स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. तदंतर नगर परिषद कन्हान नगराध्यक्ष करूणा अनिल आष्टन कर हयाना राष्ट्रीय सफाई मजदुर काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री गणेश नुन्हारे यांच्या नेतुत्वात भेट घेऊन त्यांचे स्वागत करून स्थाई व अस्थाई मजदुरांना योग्य न्याय देत सहकार्य करण्याची मागणी करण्यात आली. असता आपल्या मागण्या ठरावात घेऊन मंजुर करण्याचे आश्वासन नगराध्यक्षा करूणा आष्टनकर हयांनी संघटनेच्या पदाधिका-यांना दिले. याप्रसंगी राष्ट्रीय सफाई मजदुर काँग्रेस नगरपरिषद कन्हानचे स्थाई व अस्थाई मजदुर प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केरला के महामहिम राज्यपाल आरिफ मोहम्मद खान का एन.वी.सी.सी. द्वारा स्वागत-सत्कार

Fri Oct 21 , 2022
नागपूर :-  दि. 19 अक्टुंबर 2022 को ह्यूमन चेरिटेबल ट्रस्ट, नागपुर के सभापति  माजिद पारेख के नेतृत्व में रूवर्गीय अब्दुल करीम पोरख  स्मृती में इंडिया पीस सेंटर एवं  ह्युमन चेरिटेबल ट्रस्ट नागपुर के संयुक्त तत्वाधान में केरला महामहिम राज्यपाल आरिफ मोहम्मद खान के साथ चर्चासत्र का आयोजन किया गया था। जिसमें सभी संस्थाओं एवं गणमान्य नागरिकों को आमंत्रित किया गया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com