कामठीच्या पशुवैद्यकिय रुग्णालयात चोरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 29 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसापासून चोरट्यानी घरफोडीचे सत्र मोठ्या प्रमाणात राबविले असुन दिवसेंदिवस चोरी च्या घटना वाढत आहेत.नुकतेच मागील आठवड्यात कुंभारे कॉलोनी परिसरात दोन घरफोडी झाल्याच्या घटनेला वीराम मिळत नाही तोच काल सकाळी 11 वाजता कामठी च्या बुनकर कॉलोनी स्थित पशुवैद्यकिय दवाखान्यात अज्ञात चोरट्यानी मुख्य दाराचा कुलूप तोडून नगदी 4 हजार रुपये व एक जुने कंप्युटर अंदाजे किमती 1000 रुपये असा एकूण 5 हजार रुपयांची घरफोडी झाली असून यासंदर्भात फिर्यादी डॉ विलास गोखरे वय 48 वर्षे रा बुनकर कॉलोनी कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

हृदयविकाराच्या धक्क्याने महिलेचा मृत्यु

Fri Jul 29 , 2022
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 29 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी रहिवासी महिला ही आपल्या राहत्या घरात घरगुती कामात व्यस्त असता आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने महिलेचा तडकाफडकी मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी 7 दरम्यान घडली असून मृतक महिलेचे नाव विध्दाय विजय मेश्राम वय 50 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.या घटनेने कुटुंबात शोककळा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com