संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसापासून चोरट्यानी घरफोडीचे सत्र मोठ्या प्रमाणात राबविले असुन दिवसेंदिवस चोरी च्या घटना वाढत आहेत.नुकतेच मागील आठवड्यात कुंभारे कॉलोनी परिसरात दोन घरफोडी झाल्याच्या घटनेला वीराम मिळत नाही तोच काल सकाळी 11 वाजता कामठी च्या बुनकर कॉलोनी स्थित पशुवैद्यकिय दवाखान्यात अज्ञात चोरट्यानी मुख्य दाराचा कुलूप तोडून नगदी 4 हजार रुपये व एक जुने कंप्युटर अंदाजे किमती 1000 रुपये असा एकूण 5 हजार रुपयांची घरफोडी झाली असून यासंदर्भात फिर्यादी डॉ विलास गोखरे वय 48 वर्षे रा बुनकर कॉलोनी कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.