संदीप कांबळे,कामठी
कन्हान परिसरात दिवसेदिवस चाकु हल्ल्या च्या गुन्हयात वाढ.
कामठी: – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस एक कि मी अंतरावर असलेल्या पटेल नगर कन्हान येथे एका आरोपीने युवकाच्या छातीवर चाकु ने मारून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसानी फिर्यादीच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध सुरु केला आहे.
कन्हान शहर व परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळत असुन दिवसेदिवस मारामारी, चाकु हल्ल्या गुन्हयाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने परि सरातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण होत आहे. प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.६) एप्रिल २०२२ ला रात्री १०:३० ते ११ वाजता दरम्यान विक्की मोहसीन लोंढे वय ३२ वर्ष राह. पटेल नगर कन्हान हा आफताब अशफाक खान वय २२ वर्ष राह. पटेल नगर कन्हान यांच्या जवळ येऊन तु माझ्या सोबत गाडीवर चाल असे म्हणुन घेवुन गेला व शिवीगाळ करून ” तुने मेरी लोगो मे बदनामी की ” असे बोलुन जीवे मारण्या ची धमकी देऊन हातापाई करित चाकु सारख्या धार दार वस्तुने आफताब खान यांच्या छातीवर मारून गंभीर जख्मी केले. अश्या फिर्यादी आफताब खान यांच्या तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी कलम ३२४, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे ए एस आय गणेश पाल हे करित असुन आरोपीचा शोध घेत आहे.