– नगदी ४५६० रूपये जप्त कपण्यात आले.
कन्हान :- पोलीस अवैध धंद्यांवर कारवाई करणे करीता परिसरात खाजगी वाहणाने पेट्रोलींग करित असताना गुप्त माहितीवरून सत्रापुर – कन्हान येथील खुल्या मैदानात जुगार खेळणारे पाच आरोपीना पकडुन त्यांच्या जवळील ४५६० रूपये जप्त करून कारवाई करण्यात आली.
बुधवार (दि. २७) नोहेंबर ला १ वाजता दरम्यान कन्हान पोलीस अवैध धंद्यांवर कारवाई करणे करिता परिसरात खाजगी वाहणाने पेट्रोलींग करित असताना सत्रापुर येथे मैदानात जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पंचा सह पोलीस कर्मचारी लपत छपत सत्रापुर येथे पोहचुन खुल्या मैदानात एका झाडा खाली काही इसम जुगार खेळताना दिसुन आल्याने शिताफितीने छापा मारून पाच आरोपीना पकडले यात आरोपी १) भुपेंद्र हरीराम पलौटी वय ३२ वर्षे यांचे जवळुन ३५० रू. २) छोटु पृथ्वीराज टेंभुर्णे वय ३२ वर्षे याचे जवळुन ४१० रू.३) अजय ब्रिजेश गायकवाड वय २८ वर्षे यांचे जवळुन नगदी १८०० रू. व ८ तासपत्ते, ४) विनोद सुम्रत लोंढे वय ४४ वर्षे याचे अंगझडतीत नगदी २८० रू. व १८ तास पत्ते, ५) अजित प्रेमलाल गायकवाड वय २७ वर्षे याचे अंगझ डती नगदी ४४० रु. तसेच घटनास्थळी डावावर नगदी १२८० रु. व २६ तासपते असा एकुण ४५६० रु.नगदी व ५२ तासपत्ते मुद्देमाल पंचासमक्ष घटनास्थळावरून जप्त करून सर्व पाचही आरोपी राह. सत्रापुर कन्हान यांचे विरूध्द कलम १२ म जु का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई कन्हान पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शना कन्हान पो स्टे चे स.पो.नि. राहुल चव्हाण, पो. हवा. हरीष सोनभद्रे, म.पो. हवा. प्रतिशा मरसकोल्हे, पो. ना. अमोल नागरे, पो.ना आशिष कुंभरे, आकाश शिरसाट आदीनी यशस्वि रित्या पार पाडली.