यवतमाळ :- गेल्या 18 वर्षापासून ची वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी वेगळे महामंडळ महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून द्यावे यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना लढा देत होती या लढ्यासाठी ठाणे येथील आमदार संजय केळकर वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी होते आणि ते सतत विधानसभेत वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न मांडत आणि त्यांना महामंडळ कसे योग्य आहे ते सरकारना पटवून देत होते त्यानंतर सरकारने त्यावर केंद्रीय समिती स्थापन करून त्यांचा अहवाल प्राप्त करून घेतला. सन 2019 मध्ये महामंडळ घोषितच होईल अशा वेळेस सरकार बदलले आणि महामंडळात 2024 हे वर्ष लागले. यासाठी वृत्तपत्र विक्रेते सतत पाठपुरावा आंदोलने करीत होते. याच आंदोलनासाठी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा आमच्या प्रश्नाला पाठिंबा देऊन विधिमंडळात वाचा फोडली. त्यानंतर सतत बैठका होऊन पावसाळी अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विक्रेत्यांसाठी महामंडळ देऊ असे घोषित केले होते त्याची अंमलबजावणी काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानिमित्त महाराष्ट्र शासनाचे आभार मानून वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी आज सकाळी सेंटरमध्ये पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. विक्रेत्यांसोबत पत्रकार बांधवांना सुद्धा महामंडळ घोषित केल्याबद्दल शासनाचे आभार मानण्यात आले. या महामंडळाकरिता महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटना तसेच स्थानिक संघटना सतत प्रयत्नशील होते. याच वेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुद्धा आभार व्यक्त करण्यात आले. यासाठी आम्हाला सहकार्य करणारे आमदार संजय केळकर विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी अध्यक्ष अशोक शिंदे सचिव किरण कोरडे उपाध्यक्ष राजू हनवते कोषाध्यक्ष श्रीराम खत्री महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष जरसंतोष शिरभाते ज्येष्ठ विक्रेते कस्तुरचंद सेठीया, श्रीपाद तोटे शिवशरण चावरे कमलनयन कोठारी मोरेश्वर घुमडे, रवींद्र चव्हाण अविनाश पांडे महेंद्र पाटील महेंद्र भगत सुनील विखार, गणेश कांबळे सचिन शेटे, प्रमोद मांडळे, धर्मेंद्र मुणोत, अविनाश पांडे मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेता बांधव उपस्थित होते.