संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-15 ऑगस्ट ला सकाळी 8 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्राच्या परिसरात ध्वजारोहण
कामठी :- 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला आकर्षक रोषणाईने सजावट करण्यात आली आहे राष्ट्रीय तिरंगा ध्वजाच्या रंगानी ड्रॅगन पॅलेस सर्वांचे लक्ष वेधीत आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे ड्रॅगन पॅलेस च्या प्रमुख ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करता येईल तसेच परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात येईल.
हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या परिसरात सकाळी 8.30 वाजता व सकाळी 9 वाजता दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रात सुद्धा ऍड सुलेखा कुंभारे ध्वजारोहण करतील.ओगावा सोसायटी,ड्रॅगन पॅलेस टेम्पल, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र ,ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर,हरदास शैक्षणीक व सांस्कृतिक संस्था,दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र,दादासाहेब कुंभारे विद्यालय,हरदास प्राथमिक शाळा,येथील पदाधिकारी, धम्मसेवक,धमसेविका,शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी ,विदयार्थी इत्यादी ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहतील.