नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत प्लॉट नं. १२. रमानगर, पंच्याऐंशी प्लॉट एरीया, गल्ली नं. ५, नागपूर येथे राहणारे फिर्यादी प्रल्हाद रामचंद्र पाटील, वय ८२ वर्ष, हे मेडीकल चौक येथील स्टेट बैंक ऑफ इंडिया येथुन पेंशनची रक्कम ४०,०००/- रू. घेवुन ई-रिक्षाने शताब्दी चौक येथे आले व तेथुन पायदळ घरी जात असतांना, त्यांचे समोरून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन अनोळखी ईसम वय अंदाजे ३० ते ४० वर्ष वयोगटातील यांनी येवून, त्यांचेपैकी मागे बसलेल्या इसमाने फिर्यादीचे हातातील पैसे तथा वेग-वेगळे पासबुक व चेकबुक असलेली कापडी पिशवी जबरीने हिसकावुन पळुन गेले. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे दुचाकीस्वार अनोळखी आरोपींविरूध्द कलम ३०९ (४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपी नामे १) सोनूकुमार शिवप्रसाद नट, वय ३२ वर्ष, रा. झक्करपूर, ता. पत्थलगाव, जि. जसपुर, पोस्ट गाला, ठाणा पत्थलगाव राज्य छत्तीसगढ, २) आकाशकुमार रोशनलाल नट, वय ३० वर्ष, रा. डिजापारा, पोस्ट गाला, ठाणा पत्त्थलगाव, राज्य छत्तीसगढ, ३) वासुदेव मोहनलाल नट, वय ४७ वर्ष, रा. पोस्ट गाला, गुणा पत्थलगाव, राज्य छत्तीसगढ़ यांना पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत केडीके कॉलेज चौक येथुन ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना अधिक विचारपूस केली असता, त्यांनी वर नमुद गुन्हयाव्यतीरिक्त पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत जबरी चोरीचा गुन्हा तसेच, राज्य झारखंड पोलीस ठाणे डाटलगंज हद्दीत वाहन चोरीचा गुन्हा, तसेच राज्य छत्तीसगढ़ हद्दीतील पोलीस ठाणे जेजेपूर हद्दीत एक वाहन चोरीचा गुन्हा, पोलीस ठाणे सरखंडा हद्दीत एक जबरी चोरीचा गुन्हा, पोलीस ठाणे तोरवा हद्दीत एक वाहन चोरीचा गुन्हा असे एकुण ०६ गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपोंचा गुन्हे अभिलेख तपासला असता, पोलीस ठाणे सरखंडा व तोरवा येथील जबरी चोरी व वाहन चारीचे गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचे ताब्यातुन रोख ६६,०००/- रू., एक टि.व्ही.एस कंपनीची अपाचे दुचाकी वाहन, तिन मोबाईल फोन, नविन कपडे, दोन नविन बेंग असा एकुण अंदाजे २,१२,९००/-रू. वा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव अजनी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि, रमेश तोले, पोउपनि. अविनाश जायभाये, पोहवा. सुनिल उवकर, रोशन तिवारी, अजय यादव, देवेन्द्र नवघरे, नापोअं. नितीन वर्मा, प्रकाश राजपल्लीवार व पोअं. लिलाधर भेंडारकर यांनी केली,