महोत्सवाच्या निमित्ताने सजणार शहरातील भिंती भिंतीचित्र महोत्सवाचे उदघाटन संपन्न

१४० वैयक्तीक स्पर्धक तर विविध शहरातील ४८ चमु स्पर्धेत

चंद्रपूर – २३ ते २६ डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या ” भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे ” उदघाटन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते आझाद गार्डन येथे करण्यात आले. आयुक्त यांनी फीत कापुन तसेच स्वहस्ताने चित्र काढुन महोत्सवाची सुरवात केली.

महाराष्ट्र राज्यातील हौशी व व्यावसायिक अश्या ६३० स्पर्धकांनी यात नोंदणी केली असुन १४० वैयक्तीक स्पर्धक तर विविध शहरातील ४८ चमु चित्रकारीतेत व्यस्त झाले आहे. कलात्मक चित्रे काढण्यास विविध ठिकाणे – भिंती महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहे. भिंतींवर पांढरा रंग लावुन स्वच्छ करून देण्यात आल्या आहे ज्याद्वारे काढण्यात येणारी चित्रे आकर्षक दिसावी. स्पर्धेची सुरवात झाली असुन आयुक्तांनी या सर्व स्थानांवर भेटी देत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

चंद्रपूर शहर सुशोभीकरण व सौंदर्यीकरण या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग या ३ स्पर्धा यात घेण्यात येत आहेत. भाग घेणाऱ्या स्पर्धकांची जेवण,पिण्याचे पाणी, राहण्याची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येणार असुन रंगरंगोटीसाठी आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा मनपातर्फे करण्यात येत आहे.

सदर स्पर्धा ही शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण अभियान, स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घेण्यात येत असुन विचारप्रवर्तक आणि नाविन्यपुर्ण अशी भिंतीचित्रे तयार करु शकणाऱ्या चित्रकार आणि कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा आहे. शहरातील मुख्य दर्शनी भागातील भिंतींवर स्वातंत्र्य संग्रामातील शिलेदार, पर्यावरण संरक्षण, स्वच्छतापर संदेश, प्लास्टीक बंदी चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव, रेन वॉटर हार्वेस्टींग अशा विविध १४ विषयाचे चित्रण केले जाणार आहे.

स्पर्धेअंतर्गत मोठी बक्षिसे ठेवण्यात आली असुन स्पर्धकांचा उत्साह पाहण्याजोगा आहे. आझाद बागेत झालेल्या या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन उत्कृष्ट संचालन धनंजय तावाडे यांनी केले. याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे,शहर अभियंता महेश बारई,उपअभियंता विजय बोरीकर,अनिल घुमडे, सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, सचिन माकोडे,राहुल पंचबुद्धे,विधी अधिकारी अनिल घुले,वैद्यकीय स्वच्छता अधिकारी डॉ.अमोल शेळके,रवींद्र कळंबे,संतोष गर्गेलवार, छबूताई वैरागडे, गोपाल मुंदडा, आकाश घोडमारे, मुग्धा खांडे, रवि निखार,हरिदास नागपुरे, संतोष पिंपळकर, राधिका मुंदडा, जितेंद्र राजगिरवार, बंडु देवोजवार, मंगेश खोब्रागडे, सर्व योग्य नृत्य परिवाराचे सदस्य तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बांधकाम साहित्य उघड्यावर टाकल्याने ७००० दंड वसुल.

Sat Dec 24 , 2022
चंद्रपूर  – चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रस्त्यावर बांधकाम साहीत्य ठेवणाऱ्या नागरिकांकडुन ७००० रुपयांचा दंड वसुल केला आहे. संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद सुद्धा देण्यात आली आहे. यापुर्वीही अश्या प्रकारची दंडात्मक कारवाई चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे व विभागामार्फत सातत्याने उपद्रवी घटकांवर नजर ठेवण्यात येते. मात्र या घटनांची पुनरावृत्ती बघता स्वच्छतेप्रती आपली मानसिकता बदलण्याची गरज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!