तहसील कार्यालयाचे आवारात उभा ट्रक चोरी..!

 ट्रक  क्र . एम.एच-२७ /बी.एक्स.-३८२३ कि. २० लाख- रू.व १० ब्रास रेती कि.६२ ,४००/- रू.एकुण २०लाख६२ हजार, ४००/-रू.चा मुद्देमाल अज्ञात चोराने तहसिल कार्यालयाचे आवारातुन अनधिकृतपणे चोरून नेले.

 पारशिवनी :- पो.स्टे .पारशिवनी अंतर्गत ०१ कि.मी. अंतरावर मौजा तहसिल कार्यालय, पारशिवनी येथे सोमवार दिनांक २८/११/२०२२ चे पहाटे ०४.०० वा . च्या दरम्यान पोलीस स्टेशन पारशिवनी येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की , तहसिल कार्यालयाचे आवारात रेती वाहतुक करण्याचा परवाना नसतांना वाहतुक करतांना मिळुन आलेला ट्रक क्र . एम . एच . २७ / बी . एक्स ३८२३ हा महसुल विभागातील कर्मचारी पथकातिल तलाठी गणेश चौहान तलाठी किष्णा माने, तलाठी देवाशिष देशमुख यांनी दंडात्मक कार्यवाही करीता जप्त करून तहसिल कार्यालयाचे आवारात उभा करून ठेवलेला ट्रक क्र . एम . एच- २७ / बी . एक्स.- ३८२३ किमती अंदाजे २०/ – लाख रू . व १० ब्रास रेती किमंती ६२ हजार , ४०० / – रू . असा एकुण २० लाखा,६२ हजार , ४०० / – रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोराने पारशिवनी तहसिल कार्यालयाचे आवारा तुन गेट तोडून अनधिकृतपणे प्रवेश करून चोरून नेले . – सदर प्रकरणी फिर्यादी – राजु नत्थुजी कुकडे , वय ५७ वर्ष , रा . काटोल नाका , जगदिश नगर , शिवमंदीर जवळ नागपुर ह . मु तहसिल कार्यालय पारशिवनी यांचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन पारशिवनी येथे अज्ञात आरोपी विरूद्ध कलम ३७९ , ४४८ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरू असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राहुल सोनवने याचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दिलीप बासोडे पोलीस स्टेशन पारशिवनी हे पुढील तपास करीत ट्रक व आरोपी चा शोध घेत आहे .

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदार याद्या अद्ययावत करण्यास नागरीकांचे सहकार्य आवश्यक - आयुक्त विपीन पालीवाल

Wed Nov 30 , 2022
३ व ४ डिसेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन चंद्रपूर  :- भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमां तर्गत नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी, सूचना व प्रतिक्रियांसाठी चंद्रपूर शहरातील नागरीकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी बैठकीत संगितले. राजकीय पक्षांचे पदाधिकारी / माजी मनपा सदस्य यांच्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी मनपा राणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com