प्राणांतीक अपघातास कारणीभूत ट्रक चालक आरोपी ताब्यात

नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत तरोडी पुलाचे वर आउटर रिंग रोडवर, ट्रक क. आर.जे ११ जि.बी ६३५४ चा चालक नामे मियाज मोहम्मद अनवर खान वय ४४ वर्ष रा. हसनपूर नोहू जि. नऊमेवत, हरीयाणा याने त्याचे ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे घटनास्थळी धोकादायकरित्या ऊभा केल्याने सलेंडर गाडी क्र. एम.एच ४० एल.व्ही ०९९० चा नालक नामे राकेश बंडू शेंडे वय २६ वर्ष रा. मुंडरी ता.मोहाळी जि. भंडारा हा त्याचे मोटरसायकल चालवितांना ट्रकचे मागील बाजुस धडकल्याने खाली पडुन गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारांकामी मेडीकल हॉस्पीटल येथे नेले असता तेथे डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. याप्रकरणी फिर्यादी मुकेश साहेबलाल पिछोडे, वय २७ वर्ष, रा. सि.सी चौक, वर्धा रोड, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि, ठाकरे यांनी आरोपी ट्रक चालकाविरूध्द कलम ३०४(अ) भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक, एकूण ३ गुन्हे उघडकीस

Sat May 18 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे पारडी हद्दीत प्लॉट नं. १७८, डी/५, भवानी नगर, पारडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी सुरेश शंकरराव कटाईन वय ६८ वर्ष हे त्यांचे राहते पराला कुलूप लावुन चंद्रपूर येथे गेले असता कोणीतरी अज्ञात आरोपीने घराचे मुख्य दाराचे लॉक तोडुन घरात प्रवेश करून आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण १,०५,०००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com