कोदामेंढी :- येथे नुकतेच वार्ड नंबर 2 स्थित झेण्डा चौकात कुपार लिंगो कोया पुनेम ध्वजरोहन एवं जनजागृती सम्मलेन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8 ते 11 दरम्यान गावातील काढण्यात आलेल्या रैलित चौकाचौकात सादर करण्यात आलेल्या गोंडी नृत्याने संपूर्ण गाव दुमदुमले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमातील जंगल से झाड टूटेगा नही और गोंड ज़ुकेगा नहीं साला, या गाण्यावरील गोंडी नृत्य ठरले आकर्षनाचे केंद्र. सकाळच्या रैलित व सायंकाळच्या सांस्कृतिक व महाप्रसादाच्या कार्यक्रमात गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राजकीय व सामाजिक क्षेत्रातिल गणमान्य नागरिक सह गावातील सामान्य पुरुष, महिला व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुलसीदास वरखड़े, शिवप्रसाद मरसकोल्हे,कचरु सलामे, इसीराम वरखड़े, निकेश कंगाली, कवडु उइके, गजानन वरखड़े, घनश्याम वरखड़े, अनिल धुर्वे, संदीप धुर्वे, तुळसा सरोते, बारसा उइके, सुशीला उइके,विमल उइके, लक्ष्मी मरसकोल्हे , शकुंतला कुंभरे, देवका सिरसाम, गीता वरखड़े, ममता वरखड़े, कविता वरखड़े सह गावातील आदिवासी सामाजातील पुरुष, महिला, बालगोपालान्नी परिश्रम घेतले व गावकऱ्यानी सहकार्य केले.
जंगल से झाड टूटेगा नही और गोंड ज़ुकेगा नहीं साला, या गाण्यावरील गोंडी नृत्य ठरले आकर्षनाचे केंद्र
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com