नागपूर :- पोलीस ठाणे प्रतापनगर नागपुर येथे फिर्यादी नामे जितेन्द्र वसंतराव पालकर वय ५४ वर्ष रा. प्लॉट नं. २८, गुडघे लेआउट, नागोबा मंदीर यांनी रिपोर्ट दिली की, त्यांची मुलगी दिनांक ०८/०३/२०२४ चे सांयकाळी ०७:०० वा दरम्यान अॅक्टीवा गाडी क्र. MH-31-FH-6772 ग्रे रंगाची इजीन न.JF50ET9124178, चेचीस नं. ME4JF50CAJT124082 किं.अं.३०,०००/- रू हीने तिचे आजीस सोडणेकरीता सप्तश्रृंगी ज्वेलर्स बाजुचे गल्ली मध्ये महल्ले यांचे घरासमोर, येथे गेली असता तिथे गाडी पार्क करून ज्वेलर्स चे दुकानात गेली व नंतर सायंकाळी ०७:१५वा दरम्यान येवुन पाहीले असता गाडी दिसुन आली नाही. अशा रिपोर्ट वरून पो. ठाणे राणाप्रतापनगर येथे १०८/२०२४ कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान पोउपनि संतोष राठोड, पो. ठा. राणाप्रतापनगर नागपुर दिनांक १२/०३/२०२४ रोजी पो. ठाणे हद्दीत सोबत स्टॉप पोहवा / ३०२८, दिनेश भोगे, पोशि/१७००७, अंकुश कनोजिया, पोशि/१४३२९, डिक्रुज सह पेट्रो मोबाईल ने पो. ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, अवैध धंदे चेक करणेकामी पेट्रोलींग करीत असतांना मोखारे कॉलेज जवळ, खामला आउटर रिंगरोड ने जात असतांना एक संशईत ईसम मोपेड गाडीवर आम्हास पाहुन पळु लागला त्यामुळे आम्हास त्यांचेवर संशय ताब्यात घेवुन त्याचेकडुन वर नमुद गुन्हयातील चोरीस गेलेली अॅक्टीवा गाडी क्र. MH-31-FH-6772 जप्त करण्यात आली असुन सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान अटक आरोपी कडुन कबुली निवेदन घेवुन मेमोरंडम पंचनामा कारवाई दरम्यान वर नमुद मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पो. ठाणे प्रतापनगर तसेच नागपुर शहर हद्यीतील वर नमुद गुन्हे उघडकीस आले आहेत.
तसेच पो. ठाणे प्रतापनगर दाखल अप. कं.११८/२४ कलम ३९५,३९७ भादवि. सहकलम ३७(१), १६५ मपोका मध्ये यातील नमुद आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालकांनी मिळुन फिर्यादीस रात्रीच्या वेळी रोडवर अडवुन त्यास धातुचे पाईपने मारहाण करून त्याचा मोबाईल बळजबरी हिसकावुन घेवुन दरोडयाचा गुन्हा करुन पळुन गेले होते. यातील आरोपीतांची गुन्हा करण्याची पध्दत अशी की रोडने रात्री एकटे जाणारे येणारे लोकांना एकटे गाठून त्यांना मारहान करुन त्यांचे कडून किंमती वस्तू घेवून जबरी चोरी करतातव पळून जातात. पोलीस ठाणे प्रतापनगर यांचे पथकाने या टोळीचा सखोल तपास केल्यामुळे वाहन चोरीचे गुन्हयाचे तपासामध्ये दरोडा, जबरी चोरी ई. गुन्हे केल्याचे नमुद आरोपीतांनी कबूल केल्याने त्यांचे कडून वरील प्रमाणे गुन्हयात गेलेला माल जप्त करण्यात आला आहे.
तसेच याच आरोपीतांनी दिनांक ०६/०३/२०२४ रोजी रात्रीचे वेळेस पो. ठाणे बजाजनगर हद्यीमध्ये उत्तर दक्षिण हॉटेल समोर एका व्यक्तीस चाकुचा धाक दाखवून त्याचेकडील दोन मोबाईल हिसकावुन घेवुन जबरी चोरी केलेली होते.
अशा प्रकारे नागपुर शहर हद्यीमध्ये विविध ठिकाणी चाकुचा धाक दाखवुन मारहाण करून त्यांना लुटणाऱ्या टोळीला त्यांचा नियमित पाठलाग करून त्यांना पकडण्यात यश आले असून त्यांचेकडुन विविध गुन्हयातील मुद्देमालाची हस्तगत करण्यात अलेला आहे. त्यामुळे जबरी चोरी, वाहन चोरीचे अधीक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
यातील दोन आरोपी पोलीस ठाणे प्रतापनगर यांचे पथकाने वाहन चोरीचे गुन्हयामध्ये निष्पन्न केले होते तर युनीट २ चे पथकाने ६ आरोपी वाहन चोरीचे गुन्हयासंबंधाने निष्पन्न केले होते.
प्रतापनगर पोलीसांनी सदर आरोपीतांकडे तपास करुन वाहन चोरीचे तपासामध्ये आता पावेतो या टोळीकडून एकूण ०५ दुचाकी वाहने, ०७ मोबाईल फोन, हस्तगत करुन प्रतापनगर पोलीसांचे तपासामध्ये नमुद आरोपीतांनी ०१ दरोडा, ०१ जबरी चोरी, ०५ वाहन चोरी व ०२ घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच गुन्हे शाखा युनीट २ यांनी वरील पैकी ०६ आरोपी वाहन चोरीचे गुन्हयात पकडून त्यांचे कडून ०६ दुचाकी वाहने जप्त केरुन प्रतापनगर पोलीसांचे ताब्यात दिले होते. अशा प्रकारे सदरचे दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी करणारे टोळीकडून आता पावेतो एकूण ०१ दरोडा, ०१ जबरी चोरी, ११ वाहन चोरी, ०२ घरफोडी असे एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग यांचे निर्देशानुसार व अनुराग जैन पोलीस उप-आयुक्त परि.क्र. ०१, नागपुर शहर, सतिशकुमार गुरव, सहायक पोलीस आयुक्त, रणजीत सांवत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हरीशकुमार बोराडे, पोनि गुन्हे, पो. ठा. राणाप्रतापनगर नागपुर शहर, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि संतोष राठोड, पोउपनि सतिश भोले, पोहवा/३०२८, दिनेश भोगे, पोहवा/१३८४, एकनाथ पाटील, पोना/५८७८ विशेषकुमार, पो.अं/१७००७, अंकुश कनोजिया, पो.अं/१४३२९, अलेकझांडर डिक्रुज, मपोहवा/४९१२ निलीमा सर्व नेमणुक पो.स्टे. राणा प्रतापनगर यांनी केली आहे.