पुणे :- विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि शहरी विकास मंत्रालयामार्फत आजपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये या यात्रेच्या शहरी अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला.
कोल्हापूर मधील सावित्रीबाई फुले रुग्णालय या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी यावेळी आयुष्यमान भारत कार्ड, गोल्डन कार्ड तसेच पंतप्रधान स्वनिधी योजना इत्यादी विविध सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली व या योजनांसंदर्भात नोंदणी करण्यात आली. नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
26 फेब्रुवारी पर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा महाराष्ट्राच्या शहरी भागांमधून प्रवास करणार असून यावेळी विविध सरकारी योजनांसाठी लाभ घेण्यासाठी नागरिकांनी या कार्यक्रमांच्या ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन सरकारी विभागांच्या वतीने करण्यात येत आहे.