पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील बीएलए ची आढावा बैठक संपन्न

नागपूर :- नागपूर शहर कॉंग्रेस कमेटीच्या निर्देशानुसार आगामी मनपा, लोकसभा व विधानसभा या निवडणुकीच्या पूर्वतयारीकरिता विधान सभानिहाय बीएलएच्या नियुक्त्या बुध कार्यकारीणी तयार करण्याचे काम पूर्व नागपूर विधान सभा क्षेत्रात आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात रविवार 9 जुलैला आढावा बैठकीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. आमदार ॲड. अभिजित वंजारीसह या बैठकीत शहर कॉंग्रेस कमेटीचे महामंत्री व समन्वयक दिनेश बानाबाकोडे, पूर्व नागपूर विधान सभा क्षेत्राचे पर्यवेक्षक राजेश देंगे, प्रभाग अध्यक्षाच्या निवडणुकीकरिता नेमण्यात आलेले निरिक्षक मुजीब वारसी, माजी नगरसेवक नितिन साठवणे, ब्लॉक क्र. 3 चे अध्यक्ष  राजेश पौनीकर, ब्लॉक क्र. 1 चे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, माजी नगरसेविका नयना आहे प्रामुख्याने उपस्थित होते.पूर्व नागपूर विधान सभा क्षेत्रात 340 बुथ असून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक बुथवर प्रत्येक पक्षाचा अधिकृत बीएलए नेमला जातो. त्यानुसार ऑक्टोबर 2023 पासून मतदार यादीचे पूर्ण निरिक्षणाचे काम सुरू होणार असून पूर्व नागपूर विधान सभा क्षेत्रात निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सर्व कार्यकर्ते सज्ज झाले आहे. याशिवाय 340 बुथवर महत्वाच्या कार्यकर्त्याला बुध अध्यक्ष नेमूण प्रत्येक बुथवर किमान 10 व्यक्तींना त्या बुथच्या कार्यकारीणीमध्ये समावून घेण्यासाठी आमदार अॅड. अभिजित वंजारी यांनी सर्व कार्यकत्यांना आदेश दिले. यासोबत संघटनेच्या माध्यमातून सर्व प्रभाग अध्यक्षांची सर्वसंमतीने याच बैठकीमध्ये निवड करण्यात आली. त्यामध्ये ब्लॉक क्र. 3 मध्ये प्रभाग क्र. 27 मध्ये नितीन झोड, प्रभाग क्र. 26 मध्ये पंकज चाफले, प्रभाग क्र. 23 यामध्ये कैलास मेश्राम तसेच ब्लॉक क्र. 1 मध्ये प्रभाग क्र. 21 मध्ये राजेश खानोरकर, प्रभाग क्र. 5 मध्ये योगेश सलामे यांची प्रभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार सर्व ब्लॉक अध्यक्ष व प्रभाग अध्यक्षांना तात्काळ वार्ड अध्यक्ष व प्रभागाची कार्यकारीणी तयार करण्याचे आदेश देण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शाहीर प्रदीप कडबे यांचा जाहीर सत्कार

Tue Jul 11 , 2023
रामटेक :- लोकशाहीर वस्ताद स्वर्गीय भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुरुवंदन सोहळा भव्य विदर्भस्तरीय शाहीर कलाकार मेळावा नुकताच कामठी येथील श्रीराम जानकी मंगल कार्यालय येथे ४ जुलै रोजी पार पडला. भारतीय कलाकार शाहीर मंडळ व सर्वस्तरीय कलाकार संस्था तुमसर भंडारा द्वारे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान या सोहळ्यामध्ये किरणापुर येथील भीमशाहीर प्रदीप बागवान कडबे यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com