एम्प्लॉईज फेडरेशनची राज्यसभा धूमधडाक्यात संपन्न

अमरावती :- दि. 5 मे, 2023 रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ.के.जी.देशमुख सभागृहामध्ये ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनची राज्यसभा धूमधडाक्यात संपन्न झाली.

राष्ट्रगिताने राज्यसभा सुरु झाली. सभेकरिता महाराष्ट्र राज्यातील एम्प्लॉईज फेडरेशनचे जवळपास सर्वज राज्य पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष/जिल्हासचिव तसेच वरिष्ठ पातळीवरील बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते. ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनद्वारा आयोजित महाराष्ट्र राज्यसभेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना केंद्रीय अध्यक्ष प्रा. मधुकरराव उईके यांनी महाराष्ट्र राज्यातील खऱ्या आदिवासी समाजावर सातत्याने होणारे अन्याय अत्याचार, तसेच शासकीय नोकरभरतीमध्ये घुसखोरी केलेल्या गैरआदिवासींची दिवसेंदिवस वाढती पदसंख्या कायमस्वरुपी थांबवावयाची असेल तर खऱ्या आदिवासी समाजातील बुध्दिजिवीवर्ग म्हणून समजल्या जाणाऱ्या खऱ्या आदिवासी समाजातील कर्मचारी/अधिकारी एकत्रित येणे काळाजी गरज आहे. महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचेही असू द्या, खऱ्या आदिवासींना निवडणूक काळात केवळ गृहीत धरल्या जात आहे, खऱ्या आदिवासींकडून जेव्हा केव्हा संविधानीक अधिकाराची मागणी होते, तेव्हा खऱ्या आदिवासींना सतत डावलल्या जाते, त्या उलट महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक सरकार हे गैरआदिवासी धनगर, कोष्टी, माना, ठाकूर, मन्नेरवार जातीच्या लोकांना पाठीशी घातल्या जात आहे.

तत्कालीन महाराष्ट्र सरकारने, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) मुंबई या संस्थेकडून धनगर जातीचा अभ्यासपुर्ण सर्वे करुन अहवाल मागविला आहे, तो अहवाल मा. सर्वोच्च न्यायालय मागत असतांना देखील सदर अहवाल हेतूपुरस्सरपणे सादर करायला तयार नाही.एखाद्या जातीला खऱ्या आदिवासींच्या आरक्षण सुचिमध्ये समावेश करुन घ्यावयाचे आहे तर त्या संदर्भातील सर्व अधिकार केवळ आणि केवळ संसदेलाच आहेत, सध्यस्तितील महाराष्ट्र सरकार त्या अधिकाराचे हनन करीत आहे, त्यामुळे पुढील भविष्यामध्ये ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन द्वारा आदिवासी समाजामध्ये जनजागृतीचे मोहीम राबवून येणाऱ्या निवडणूक काळामध्ये महाराष्ट्र राज्याला धडा शिकविले जाईल, असे प्रतिपादन केले.राज्यसभेकरिता उपस्थित राज्यातील डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हाध्यक्ष नागपूर, शांताराम उईके जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, डॉ.हरिदास धुर्वे जिल्हाध्यक्ष यवतमाळ, राजेंद्र बरेला जिल्हाध्यक्ष जळगांव, प्रभाकर उईके जिल्हासचिव वर्धा, सुरेशराव मडावी जिल्हाध्यक्ष अकोला, डॉ. रमेश गावीत, सचिव मुंबई विद्यापीठ शाखा, डॉ.प्रमोद वरकडे जिल्हा सचिव, भंडारा यांनी आप आपल्या जिल्ह्यातील सन, 2022-2023 मध्ये केलेल्या संघटनात्मक कार्याचा आढावा सादर केला. सभेचे अध्यक्ष तथा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष यशवंत मलये यांनी विषय पत्रिकावरील सर्वच विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. तसेच सदर विषय हे खऱ्या आदिवासींना संविधानीक अधिकार बहाल करणारी असल्यामुळे व ते राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येत असल्यामुळे सरकारला शिफारस करुन आदिवासी आमदार/खासदर यांचे मार्फत शासनस्तरावर लावून धरणे, त्यावर त्यांचेकडून आदिवासी समाजहिताकरिता कोणत्याच प्रकारचे सकारात्मक प्रतिसाद मिळाले नाही तर महाराष्ट्र राज्यातील ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन संघटनात्मक बांधणी करुन समविचारी आदिवासी संघटना सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचेविरोधात मोर्चेबांधणी करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. सभेची प्रस्तावना फेडरेशनचे राज्य महासचिव विठ्ठलराव मरापे यांनी मांडली, तर केंद्रीय महासचिव विजय कोकोडे, केंद्रीय कार्याध्यक्ष सुरेश कन्नाके, केंद्रीय संघटक डॉ. चेतनकुमार मसराम, तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्याध्यक्ष गजमल पवार तसेच चंद्रकांता चौधरी यांनी या देशातील खऱ्या आदिवासींच्या भविष्यकालीन शैक्षणिक, सामाजिक, तसेच आर्थिक दिशा ठरवितांना संबंधित विभागातील विभागीय अध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष/जिल्हासचिव आणि सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांसमोर फेडरेशनची संघटनात्मक बांधणी करतांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. राज्य उपाध्यक्ष डॉ. कृष्णा पराड, सहसचिव राकेशकुमार कोडापे, राज्य संघटक किसनराव तळपाडे, राज्य सहकार्याध्यक्ष अमरसिंह गेडाम, मुंबई विभागीय अध्यक्ष तुकाराम मारगाये, अमरावती विभागीय अध्यक्ष राजेंद्र सलामे यांनी फेडरेशनच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केवळ आणि केवळ आदिवासी समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्रावर शिक्षण शिकून शासकीय नोकरी मिळविल्यामुळे पुढील भविष्यातील नवीन पिढीसाठी तन, मन, धनाने कार्य करण्या्याचे आश्वासन दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कन्हान मे मनाया गया प्रकाश आंबेडकर का जन्म दिवस 

Fri May 12 , 2023
कन्हान :- वंचित बहुजन आघाडी के संस्थापक अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहब आंबेडकर के जन्मदिन की अवसर पर वंचित बहुजन आघाडी शाखा कन्हान की ओर से डॉ. बाबासाहब आंबेडकर चौक स्थित विश्वरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया गया. एवं पंजाब नॅशनल बँक के सामने जनसंपर्क कार्यालय में नंदिनी वंजारी केक काटकर एवं आतीषबाजी़ कर जन्म दिवस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!