भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाऊ विमानातून पंतप्रधानांनी केले उड्डाण

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान तेजसमधून यशस्वीरित्या उड्डाण केले.

पंतप्रधानांनी X वर त्यांचा अनुभव शेअर केला:

“तेजसमधून यशस्वीरित्या उड्डाण केले. हा अनुभव अतिशय समृद्ध करणारा होता, आपल्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढवणारा होता आणि आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावादाची नवीन भावना मला देऊन गेला.” असे पंप्रधान म्हणाले.

“मी आज तेजसमधून उड्डाण करताना अतिशय अभिमानाने सांगू शकतो की आपली मेहनत आणि दृढ निर्धार यामुळे आपण स्वयंपूर्णतेच्या बाबतीत जगातील कोणाहीपेक्षा कमी नाही. भारतीय हवाई दल, डीआरडीओ आणि एचएएल यांच्याबरोबरच समस्त देशवासियांचे हार्दिक अभिनंदन.”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपराष्ट्रपती 27 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई भेटीवर

Sat Nov 25 , 2023
– श्रीमद राजचंद्रजी जयंतीनिमित्त आयोजित ‘आत्मकल्याण दिवस’ सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती उपस्थित राहणार नवी दिल्ली :-उपराष्ट्रपती जगदीप धनखड 27 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला भेट देतील. राज्याच्या एकदिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड श्रीमद राजचंद्रजींच्या जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपराष्ट्रपतींच्य हस्ते श्रीमद राजचंद्रजींच्या भित्तीचित्राचे अनावरणही करण्यात येणार आहे. Follow us on Social Media x […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com