पोलिसांचा गुन्हेगारीवरील वचक झाला कमी!

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

-सी पी साहेब,स्थानिक रहिवासी पोलीस ठरताहेत अवैध व्यवसायिकांचे आश्रयदाते

कामठी ता प्र 25 :- पूर्वीच्या काळात गावामध्ये पोलीस दिसल्यास ग्रामस्थांची पळताभुई थोडी व्हायची एक दोन पोलिसांवरच बंदोबस्त भागायचा मात्र आज परिस्थिती बदललेली आहे.पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक कमी झाला असून सराईत गुन्हेगारांची कुंडलीसुद्धा पोलिसांकडे नसल्याचे वास्तव दिसून येत आहे.पोलिसांच्या राहणीमानात आज प्रचंड बदल झाल्याचे दिसून येत आहे.बऱ्याच पोलिसांच्या डोक्यावरील टोपी व हातातील काठी गायब झाली आहेत.तर येथील स्थानिक रहिवासी पोलीस कर्मचारी हे येथील अवैध व्यवसायिकाचे अप्रत्यक्ष आश्रयदाते ठरत आहेत.तेव्हा सी पी अमितेशकुमार साहेब!याकडे गांभीर्याने लक्ष देतील काय?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत आहेत.

सायकल जाऊन दुचाकी,चारचाकी आणि काठीऐवजी मोबाईल आला आहे.प्राचीनकाळी ब्रिटिशकाळ आणि नंतर स्वातंत्र्योत्तर काळातील पोलीस दलात व त्यांच्या गणवेशात वेळ काळानुसार खूप बदल होत गेले.बरीच वर्षे हाफ प्यान्ट वाला पोलीस होता दोन पोलिसांची जोडी हातात काठी घेऊन फिरताना दिसली तरी अनेकांना धडकी भरायची गावात पोलिसांच्या रुपात बहुरूपी आला तरी गावातील अनभिज्ञ मंडळी लपून बसायची एवढा दरारा पोलिसांचा जनमानसावर होता त्याकाळी गुन्हेगारांची कुंडली च पोलिसांना पाठ असायची त्यामुळे गुन्ह्याच्या घटना कमी असायच्या मात्र आता काळ बदलला तसा पोलिसातही बदल झाला.हाफ प्यान्ट जाऊन फुलप्यान्ट आली,पोलिसांच्या हातातील लाकडी काठ्या जाऊन आता फायबरच्या नव्या आकर्षक काठ्या आल्या.पूर्वी बहुतांश पोलिसांकडे सायकल होत्या .ड्युटी संपवून घरी आल्यावर ते डोक्यावरची टोपी काढायचे ,सायकलवर कुठेतरी बेताची काळी नेहमी अडकवलेली असायची .गंणवेशशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर जाण्याचे पोलीस धाडसही करीत नव्हते.अलीकडच्या काळात गणवेश परिधान केलेले पोलीस अभावांनेच पहायला मिळायचे .मात्र आता पोलीस दलात असलेल्या बहुतांश पोलिसांच्या हाती काठी व डोक्यावर टोपी अभावानेच दिसून येते.टोपी व काठी ही पोलिसांची शान आहे हे त्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

टोपी तर हल्ली खिशातच असते.हातात काठीऐवजी मोबाईलच दिसतो .अनेक पोलिसांच्या काठ्या घरी किंवा पोलीस ठाण्यात ठेवलेल्या असतात ज्यामुळे पोलीस दलाचा चेहराच बदललेला दिसतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाराष्ट्रात गेल्या 25-30 वर्षात 21 पत्रकार निर्दयपणे संपविण्यात आले..

Sun Feb 26 , 2023
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी -मात्र अनेक घटनात आरोपींचाच पत्ता नाही, शिक्षा झाल्याचे उदाहरण नाही -मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची खंत कामठी – राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची 7 फेब्रुवारी २०२३ रोजी निर्घृण हत्त्या झाली.. एक ठाम भूमिका घेत रिफायनरी विरोधात आवाज उठविला बद्दल त्याचा आवाज कायमचा बंद केला गेला.. गाडी खाली चिरडून अत्यंत अमानुषपणे शशिकांतची हत्त्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com