अमरदिप बडगे, प्रतिनिधी
नगरपरिषदेचे दुर्लक्ष..
खड्डा बुजविण्याची नागरिकांची मागणी..
गोंदिया :- गोंदिया शहरातील गजबजलेल्या आंबेडकर चौकात नगर परिषदेने फुटलेली पाईपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली भर रस्त्यात खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र दहा दिवस लोटून हि हा खड्डा बुजविण्यात न आल्याने खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी व सांड पाणी साचून तो रस्त्यावर येत असून अपघाताची शक्यता बळावली आहे. वारंवार तक्रारी केल्या नंतरही त्या तक्रारींची अधिकारी दखल घेत नाही. तर त्या खड्डा ज्या आजुबाजुला कोणतेही फलक नसुन कोणत्याही प्रकारच्या सावधानतेच्या सूचना न लिहिता या रस्त्यात खोदून ठेवलेला या खड्ड्यांमुळे अपघात होण्याच्या घटना वाढत असून आता हे रस्तेशाळेत, कॉलेज जात असलेल्या विध्यर्थ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठत आहेत.
रात्रीच्या वेळी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यांमध्ये वाहनधारक वाहनासह या खड्ड्यात पडण्याच्या घटना घडत आहेत. खड्ड्यां संदर्भात नगर परीषदेच्या अधिकाऱ्यांकडे नागरिक तक्रारी करतात. मात्र त्या तक्रारीची कुठली हि दखल घेण्यात येत नाही. ही परिस्थिती अशीच राहिल्यास नगर परीषदेने खोदलेल्या या खड्ड्यात पडून एखाद्याला जीव गमवावा लागेल. त्या नंतर नगर प्रशासनाला जाग येणार का ?