मौदा हद्दीत मिळून आलेल्या युवतीच्या मृत्यूचे गुढ उकलले

– स्थानिक गुन्हेशाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई

मौदा :- मौदा हद्दीत नावकार इन्डस्ट्रीयल अॅन्ड लॉनस्टीक पार्क करणीच्या प्रवेशव्दारा जवळ दि. १९/०८/२०२३ रोजी जख्मी अवस्थेत एक युवती पडून असल्याची माहिती मौदा पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून सदर युवतीला मेओ हॉस्पीटल नागपूर येथे उपचाराकरीता दाखल केले. सदर युवतीची चौकशी केली असता पोलीस स्टेशन यशोधरा नगर, नागपूर शहर येथे गिता संतोष दिनानाथ निमजे वय ३३ वर्ष रा. धम्मदिप नगर, नागपूर हि हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली असल्याचे समजले. तसेच गिता निमजे हि मतीमंद असल्याचे माहिती समोर आली. त्यावरुन मौदा पोलीसांनी पो.स्टे. यशोधरा नगर येथे संपर्क साधून हरविलेली मुलगी  गिता निमजे हिला यशोधरा पोलीसांचे स्वाधीन केले. दि. २०/०८/२०२३ रोजी मेओ हॉस्पीटल येथे उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मरणाबाबत निश्चीत कारण नसल्याने तिचे वडीलाचे रिपोर्टवरुन अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली. सदर प्रकरणी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांनी घटनास्थळी भेट दिली. मतिमंद युवतीच्या मृत्युचे प्रकरण लक्षात घेता पोलीस स्टेशन मौदा येथील २ पथके व स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ०४ विशेष पथके तयार करून सदर घटनेची चौकशी सुरू केली. याच दरम्यान सदर युवतीचे पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तिचे डोक्याला आतून झालेल्या जखमेमुळे तिचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने अज्ञात आरोपीविरुध्द खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास खात्रीशिर माहिती मिळाली की, दि. २०/०८/२०२३ चे मध्यरात्री नवकार इन्डस्ट्रीयल लॉजिस्टीक पार्क या ठिकाणी दोन ट्रकने चालक संशवितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली त्यावरून १) महेन्द्र प्रभाकर मिसार वय ३५ वर्ष रा. हनुमान मंदीर जवळ, खेड तह ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर आणि २) प्रशांत आनंदराव नाकतोडे वय २९ वर्ष, रा. नागपरसोडी, तह. लाखांदुर जि. भंडारा यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.

सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलीक भटकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरीक्षक, राजीव कर्मलवार, अनिल राऊत, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, पोलीस हवालदार दिनेश आधापूरे, ज्ञानेश्वर राऊत, प्रमोद तभाने, मिलींद नांदुरकर, इक्बाल शेख, आशिष भुरे, रजेन्द्र रेवतकर, गजेन्द्र चौधरी, रोशन काळे, अरविंद भगत, पोलीस नायक रोहण डाखोरे, अमृत किनगे, प्रमोद भोयर, नितेश पिपरोदे, रंजित जाधव, विपीन गायधने, आशिष मुंगळे, किशोर वानखेडे, उमेश फुलवेल, विरेन्द्र नरड, संजय भरोडीया, शंकर मडावी, अभिषेक देशमुख, राहुल साबळे, चालक पोलीस हवालदार अमोल कुथे, पोलीस नायक मुकेश शुक्ला, सुमीत बांगडे, आशुतोष लांजेवार तसेच सायबर सेलचे पोलीस नायक सतिष राठोड यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रेती चोरी करणाऱ्या आरोपीताविरुद्ध गुन्हा नोंद

Fri Aug 25 , 2023
खापरखेडा :- पो.स्टे. खापरखेडा अंतर्गत ०९ किमी अंतरावर इसापूर रेती घाट येथे दिनांक २३/०८/२०२३ चे ००५ वा. ते ०१.३० वा. दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.-२९ / सी. – ६४३८ चा चालक आरोपी नामे- १) आकाश वासुदेव लोणारे वय २८ वर्ष, २) मंगेश वासुदेव लोणारे, ३२ वर्ष, रा. वार्ड नंबर ३ ईसापुर हे विनापरवाना अवैधरीत्या मोजा इसापूर कन्हान नदीच्या पात्रातून ट्रॅक्टर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com