कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या इस्माईलपुरा रहिवासी व एका गॅरेज मध्ये मेकॅनिकल म्हणून कार्यरत मोलमजुरी करणाऱ्या एका इसमाने अज्ञात कारणावरून राहत्या घरातील लाकडी फाट्याला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गतरात्री 8 दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव मो मोहीन मो शब्बीर वय 47 वर्षे रा इस्माईलपुरा कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाच्या स्नेहसंबंधीत असणारे नातेवाईकांचे रणाळा स्थित साबळे सेलिब्रेशन येथे एका लग्न समारंभाचे कार्यक्रम काल 23 नोव्हे ला सायंकाळी दरम्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात मृतकाचे घरमंडळीं सहभागी झाले होते यांच्या पाठोपाठ सदर मृतक सुद्धा कार्यक्रमात सहभागी जाण्याच्या बेतात होता .मात्र वेळीच घरीं कुणी नसल्याचे संधी साधून अज्ञात कारणावरून गळफास लावून आत्महत्या करीत जगाचा कायमचा निरोप घेतला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरिय तपासणीसाठी मृतदेह कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.मृतकाच्या पाठीमागे पत्नी , चार मुली व एक मुलगा असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.