अमरावती :-23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून विद्यापीठात पाळण्यात आला. याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्य युध्दातील मुकुटमणी तसेच थोर क्रांतीकारक भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांचा शहीद दिन विद्यापीठात संपन्न झाला. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांनी शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करून विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. शहीद दिन कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, उपकुलसचिव मंगेश वरखेडे, डॉ.सुलभा पाटील, डॉ. दादाराव चव्हाण तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विद्यापीठात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचा ‘शहीद दिन’ संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com