‘प्रती सभागृह’ उभे करत महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल;ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार निदर्शने…

सोमवारी सीमा प्रश्नावर सरकारला ठराव घ्यायला भाग पाडू – अजित पवार

नागपूर दि. २३ डिसेंबर :- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत त्यामुळे तो ठराव घ्या अशी विनंती करण्यात आली होती परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव घेतला नाही मात्र सोमवारी तो ठराव कोणत्याही परिस्थितीत घेण्यास भाग पाडू अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना महाविकास आघाडीचे आमदार श्रद्धांजली वाहत आहे आणि दुसरीकडे शिंदेसरकार कामकाज करत आहेत. मुळात सरकारने विधानसभा सदस्य म्हणून आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहून कामकाज थांबवायला हवे होते असे मत व्यक्त करत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान विधानभवनाच्या पायर्‍यांवर प्रती सभागृह भरवून महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपले विचार मांडले व महापुरुषांचा अपमान करणार्‍या सरकारचा निषेध केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लाव्हा ग्राम पंचायत निवडणुकीत बसपा समर्थित चार सदस्य विजयी

Fri Dec 23 , 2022
वाडी (प्र): नुकत्याच संपन्न झालेल्या लाव्हा ग्रामपंचायत निवडणूकीत बसपा समर्थीत ग्राम विकास लोकसेवा युवा पॅनल चे संतोष शेंडे,शीला गोलाईत,मनीषा कुंभरे,शारदा मरस्कोल्हे इत्यादी उमेदवार विजयी झाले. या विजयी उमेदवारांचे राजकुमार बोरकर,नरेंद्र मेंढें, सुधाकर सोनपिंपळे,गोपाल मेश्राम, मनोज भोरगडे, काशीनाथ भोयर, विमल डोंगरे,विनोद मेश्राम,मनोज खोरगडे,निलेश मेश्राम, लोकलाल खंडाते, आकाश डोंगरे,आकाश धमगाये,अमोल निंबुलकर,चंदू तांगडे,संदिप पटले,निलेश धामने,सुमेध ऊके, अजित ऊके,प्रंशात परिपवार,संतोष गोमासे, दुर्गा कुलसुंगे, शिला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!