आद्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणी प्रज्ञासुर्य संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती थाटात संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुका अंतर्गत येणाऱ्या वडोदा (ग्रामीण) येथे दि.११/४/२०२४ ला आद्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले तथा भारतरत्न संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन सम्यक सांस्क्रुतीक लोककला निकेतन चे संस्थापक अध्यक्ष शाहीर पुरुषोत्तम खांडेकर यांनी केले होते.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अलंकार टेंभुर्णे (अनुदान समीती सदस्य मुंबई) त्याचप्रमाणे वडोदा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच् वणीता ईंगोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीयप्रबोधनकार अनिरुध्द शेवाळे उपस्थीत होते.दुपारी २ वा.पासुन विदर्भातील अनेक नामवंत लोककलावंतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी रसीकांनी अनुभवली महान समाजसुधारक महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवणकार्य कलावंतांनी समाजामध्ये रुजवावे हि काळाची गरज आहे,असाच सुर सर्व कलावंत आणी मार्गदर्शकांच्या वाणीतुन ऐकायला मिळाला.आणी हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुत्रसंचलन शाहीर निशांत सुखदेवे ( सहसचिव)तर आभारप्रदर्शन शाहीर बादल खांडेकर संस्थेचे सचिव यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Fri Apr 12 , 2024
नागपूर :- देशभरात ज्याप्रकारे लोकशाहीची पायमल्ली सुरु आहे. तसेच संवैधानिक संस्थांवर ताबा मिळवून हुकूमशाही कारभार आहे. यासह कायदा हा सत्ताधारी पक्षासाठी नसतो, असे चित्र देशभरात दिसून येत आहे. याचे जिवंत उदाहरण नुकतेच नागपुरात माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानाजवळ दिसून आले. देशात आदर्श आचार संहिता आणि नागपुरात कलम १४४ लागू असताना भाजपचे सुमारे 40 कार्यकर्ते अश्लिल घोषणाबाजी करत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com