भारतीय खाण विभाग (इंडियन ब्युरो ऑफ माईन्स) 1 मार्च रोजी 75 वा स्थापना दिवस करणार साजरा

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद स्थापना दिवसानिमित्त संबोधित करणार

नागपूर :-केंद्रीय खाण मंत्रालयांतर्गत नागपूरच्या सिवील लाईन्सस्थित भारतीय खाण विभाग (इंडियन ब्युरो ऑफ माइन्स- आयबीएम) मुख्यालयातर्फे 1 मार्च 2023,बुधवार रोजी आपल्या 75 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील नॅशनल फायर सर्विस कॉलेज, राजनगर येथे ‘खनिज दिनाचे’ आयोजन केले जाणार आहे . केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी या एक दिवसीय कार्यक्रमाला दुपारी 3. 30 ते सायंकाळी 7 यावेळेदरम्यान संबोधित करणार आहेत. त्यांच्या हस्ते 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी शाश्वत खाण पद्धतींना चालना देण्यासाठी पंचतारांकित खाणींचा सत्कारही केला जाणार आहे. याप्रसंगी विविध खाण कंपन्यांचे सादरीकरण, आयबीएमवरच्या चित्रपटाचे प्रदर्शन, टपाल तिकीट आणि स्मरणिका प्रकाशनही होईल.

दरम्यान खनिज दिवसानिमित्त सकाळी 10 वाजता भारताच्या खाण क्षेत्रातील प्रगती आणि अलीकडील उपक्रमांवर प्रकाश टाकणाऱ्या एका विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या हस्ते केले जाईल. याच सत्रामध्ये भारतीय खाण विभागाद्वारे ड्रोनचा वापर, खाण व्यवस्थापन या विषयावर सादरीकरण होईल.

राष्ट्रीय खनिज धोरण परिषदेच्या शिफारशींनुसार भारतीय खाण विभागाची स्थापना 1 मार्च 1948 रोजी करण्यात आली. सुरूवातीला पूर्णपणे सल्लागार संस्था म्हणून लहान प्रमाणात कार्यरत असलेला हा विभाग गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या खाण आणि खनिज उद्योगाच्या विविध पैलूंवर काम करणारी एक प्रमुख राष्ट्रीय संस्था म्हणून उदयास आला आहे. वैधानिक तरतुदींची अंमलबजावणी तसेच विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची दुहेरी भूमिका हा विभाग काम करत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ठाकरे कुटुंबातील स्त्रिया 

Wed Mar 1 , 2023
अगदी अलीकडे मी एकेकाळी जे ठाकरे कुटुंबियांच्या अतिशय जवळचे मानले जायचे ज्यांचा ठाकरे कुटुंबाशी घरोबा होता निष्ठा होती जी कालांतराने ज्यांनी संपविली आणि खाल्ले त्याच घराचे वासे मोजायला सुरुवात आजतागायत ज्या अनेक कित्येक पत्रकारांनी केली त्यापैकी एक पत्रकार राजू परुळेकर यांचा, बाळासाहेब ठाकरे आणि एकंदर ठाकरेंवर कडक जबरी टीका करणारा, ऍनॉटॉमी ऑफ ठाकरे फॅमिली, या मथळ्याखाली लिहिलेला एक प्रदीर्घ लेख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com