विद्यार्थ्यांसोबत संवादातून केले ऑनलाईन वीज बिल भरण्याचे महत्व विषद

नागपूर :- शाळकरी विद्यार्थ्यांना एखादी नवीन माहिती सांगितली की ते लगेच घरी जाऊन ती माहिती आपल्या आई-बाबाला, भाऊ-बहिणी यांना सांगतात, त्या माहितीचा वापर करायला प्रयत्न करतात, शिवाय आजचा विद्यार्थी हा उद्याचा कर्तव्यदक्ष नागरिक आहे, हे लक्षात घेत महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनी जिल्हा परिषद शाळांतून विद्यार्थ्यांना ऑनलाईन वीजबिल भरणा व इतर सुविधांबाबत माहिती आणि मार्गदर्शन शिबिराचा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे.            ऑनलाईन वीज बिल भरण्याची प्रक्रीया, ऑनलाइन वीजबिल भरण्याचे फ़ायदे, त्यामुळे वाचणारा वेळ, खर्च आणि शारिरिक श्रम आदी विषयांवर विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधून राजेश नाईक यांनी खापरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल 150 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यांच्या शंकांचे समाधान केले, प्रश्नोत्तरे, छोट्या-छोट्या उदाहरणांतून त्यांना ऑनलाईन वीज बिल भरणा आणि महावितरणच्या इतर ग्राहकोपयोगी सुविधांचे महत्व विषद केले. या शिबिरानंतर अनेक विद्यार्थ्यांनी यापुढे आमच्या घरचे वीजबिल ऑनलाईन पद्धतीनेच भरणार असा मानस देखील व्यक्त केला. याप्रसंगी सावनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता दिपाली माडेलवार, खापरखेडाचे उपकार्यकारी अभियंता मंगेश कहाले यांच्यासह अभियंते, कर्मचारी आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जय-दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर तर्फे साईबाबा चरण पादुका दर्शन सोहळा आज

Thu Oct 19 , 2023
नागपूर :-  जय-दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर, गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने आणि उत्साहाने पारंपारिक पद्धतीने पारिवारीक तसेच पर्यावरणपूरक असा  नवरात्री उत्सव साजरा करीत आहे. दरवर्षीप्रमाणे , ह्या वर्षी देखील श्री दुर्गा मातेचा आशीर्वाद घेऊन आणि पारंपारिक पद्धतीने ” चला रास गरबा खेळू या”  असे म्हणत सर्व राणाप्रताप नगर अर्थात टेलिकॉम नगर, रामकृष्ण नगर, सेंट्रल एकसाइज कॉलोनी, गावंडे ले आउट आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!