संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– जख्मी पत्नी आकांशाचा उपचार सुरू असुन पती राहुल चाफले चा उपचारा दरम्यान मुत्यु
कन्हान :- पिपरी शिवाजी नगर येथील पती राहुल चाफले हयानी स्वत:च्या व पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकुन जाळुन गंभीर जख्मी झाल्याने दोघानाही उपचारार्थ शासकिय रूग्णालयात दाखल करून पत्नी च्या बयाना वरून कन्हान पोस्टे ला पती विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. पत्नी आकांशा जख्मी असल्याने उपचार सुरू असुन पती राहुल चाफले यांचा उपचारा दरम्यान मुत्यु झाला.
आकांशा राहुल चाफले वय २९ वर्ष रा. तारसा रोड शिवनगर कन्हान येथे किरायाने राहत असुन तिचे पति राहुल चिंतामण चाफले वय ३३ वर्ष रा. पिपरी शिवाजी नगर कन्हान ता. पारशिवनी जि. नागपुर हे पत्नी व पती असुन पती दारू पिण्याचे सवई चे असल्याने मागिल एक वर्षापासुन पती हा पत्नीला मारझोड करित असल्याने पत्नी ही पतीचे घर सोडुन दोन मुलांसह कन्हान ला वेगळी किरायाचे घरात राहत होती. तरी पती हा पत्नीसोबत वारंवार झगडा भांडण करायचा. शुक्रवार (दि.२९) मार्च २०२४ ला सायंकाळी ०७.३० वाजता पती राहुल हा पत्नी राहत असलेल्या घरी एका प्लॉस्टीक बॉटल मध्ये पेट्रोल घेवुन गेला व पत्नीला घरी चाल नाही तर तुला पेट्रोल टाकुन आग लावतो म्हणुन धमकी दिली. पत्नीने नका र दिल्याने राहुल ने त्याचे जवळील प्लॉस्टीक बॉटल मधिल पेट्रोल स्वतःचे अंगावर व पत्नीचे अंगावर टाकु न लायटरने आग लावली. यात पत्नी जळालेल्या अवस्थे घरा बाहेर निघाल्याने आजुबाजुच्या लोकांनी तिला लागलेली आग विझवुन कन्हान पोलीसाना माहिती दिल्याने पती व पत्नी ला उपचाराकरिता नागपुर येथे शासकिय मेडीकल रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करून पती राहुल ने पत्नीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पत्नीचे अंगावर पेट्रोल टाकुन आग लावुन गंभीर जख्मी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने फिर्यादी पत्नी आकांशा च्या बयाणावरून कन्हान थानेदार पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात फिर्यादी पत्नी तर्फे पोउपनि एकनाथ राठोड, पोहवा नरेश श्रावणकर हयानी आरोपी पती राहुल चाफले विरूध्द अप क्र २५५/२४ कलम ३०७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला. तर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि. पराग फुलझेले पोस्ट कन्हान हे करित आहे.
शनिवार (दि.३०) मार्च २०२४ ला सकाळी जख्मी पती राहुल चाफले याचा शासकिय मेडीकल रूग्णालय नागपुर येथे वैद्यकिय उपचारा दरम्यान मुत्य झाल्याची प्राथमिक माहिती कन्हान पोस्ट ला मिळाली . राहुल चाफले यांचे राहते घर पिपरी शिवाजी नगर कन्हान येथुन सायंकाळी ५ वाजता अंतिम यात्रा काढुन कन्हान नदीच्या पिपरी शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला.