नागपूर :- दिनांक २४.१२.२०२४ रोजी मा. विशेष न्यायाधिश मोक्का कोर्ट, जिल्हा न्यायाधिश-२ पि.आर कदम, यांनी त्यांचे कोर्टाचे मोक्का केस क. ११/२०१८ मधील, पोलीस ठाणे पाचपावली येथील अप. क. ९६/२०१८ कलम ३६४(अ), ३६४, ३८७, ३०७, ३२४, २१२, ३४ भा.द.वि. सहकलम ४/२५ भा.ह.का. सहकलम १३५ म.पो.का, सहकलम ३(१), (ii), ३(२), ३(४) मोक्का अॅक्ट १९९९ या गुन्हयातील आरोपी नामे १) अजय खुमान चिंचखेडे, वय २१ वर्षे, रा. कमाल चौक, शनिचरा बाजार, बार मागे, नागपूर २) सुरेन्द्र उर्फ मोनू मनोज समुद्रे वय १९ वर्ष रा. ठक्करग्राम, स्वीपर कॉलोनी, नागपूर ३) आकाश नरेन्द्र नागुलकर वय २६ वर्ष रा. आझाद नगर, बुनकर कॉलोनी, पाचपावली, नागपूर यांचे विरुध्द साक्षी पुराव्याअंती गुन्हा शाबीत झाल्याने, आरोपींना कलम ३०७, ३६४, ३४ भा.दं.वि. अन्वये ०८ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी १०,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०३ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा, तसेच कलम ३८७, ३४ भा.दं.वि. अन्वये ०५ वर्ष कारावासाची शिथा व प्रत्येकी ५,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ४५ दिवस अतिरिक्त सत्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत कॅफे रूप बार कमाल चौक, नागपूर येथे फिर्यादी नामे प्रतिक परमानंद तलरेजा वय २१ वर्ष रा. वैशालीनगर, पाचपावली, नागपूर हे बारमध्ये हजर असतांना आरोपींनी संगणमत करून फिर्यादीचे वडीलास जखमी करून त्यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व पलुन गेले. अशा फिर्यादी यांचे तकारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे आरोपींविरूध्द गुन्हा नोंदवुन आरोपींना दि. ०७,०५, २०१८ रोजी अटक करण्यात आली होती.
गुन्हयाचे तपासी अधिकारी तत्कालीन सहा. पोलीस आयुक्त भालचंद्र पंढरीनाथ मुंडे यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून अँड.अभय जिकार यांनी तर, आरोपीतर्फे अँड. हर्षल लिंगायत यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्यात कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा. निवृत्ती चांभारे, मपोहवा. अपेक्षा बोदेले व मपोअं, पपीता कन्हेरे यांनी काम पाहिले.