नागपूर :- दिनांक ३०.११.२०२४ रोजी मा. अति. सत्र न्यायाधिश-१ एम. व्ही. देशपांडे यांनी त्यांचे कोर्टाचे केस क. २०४/२०२० मधील, पोलीस ठाणे नंदनवन येचील अप. क. १९५/२०२० कलम ३०२, ३०७ भा.द.वि., सहकलम १३५ म.पो.का. या गुन्हयातील आरोपी नामे नविन सुरेश गोटाफोडे, वय ३० वर्षे, रा. देशपांडे ले-आऊट, नागपूर यांचे विरूध्द साक्षी पुराव्याअंती गुन्हा शाबीत झाल्याने, आरोपीस कलम ३०२ भा.दं.वि. अन्वये आजिवन कारावासाची शिक्षा व ५,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०५ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा, तसेच कलम ३०७ भा.दं.वि. अन्वये आजिवन कारावासाची शिक्षा व ५,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०५ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा, तसेच कलम १३५ म.पो.का. अन्वये ०१ वर्षे कारावासाची शिक्षा व २,५००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०२ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.
यातील आरोपी व फिर्यादी नामे नविन उर्फ बाल्या अशोक मुळे, वय ३१ वर्षे, रा. एलॉट नं. ६०, गाडगे नगर, रमना मारोती, नंदनवन, नागपुर हे दोघे बालपणीचे मित्र असुन आरोपीचे फिर्यादीचे घरी जाणे-येणे होते. दिनांक ०२.०४.२०२० रोजी आरोपी हा फिर्यादीचे घरी आला असता, फिर्यादीची आई नामे सुशिला अशोक मुळे, वय ५४ वर्षे यांनी आरोपीला फिर्यादी घरी नसल्याचे सांगीतले होते. या गोष्टीचा राग मनात धरून दिनांक ०४.०४.२०२० चे १०.१५ वा. ते १०.३० वा. ये सुमारास, फिर्यादीची आई किचनमध्ये काम करीत असतांना आरोपीने फिर्यादीचे आईचे गळ्यावर चाकूने वार करून जिवे ठार केले. तसेच फिर्यादी हा आईला सोडविण्यास गेला असता, आरोपीने त्याचे डावे हाताला चावा घेतला व फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी फिर्यादी याने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे नंदनवन येथे आरोपोंविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपीस दिनांक ०५.०४.२०२० रोजी गुन्हयात अटक करण्यात आली होती.
गुन्हयाचे तपासी अधिकारी तत्कालीन पोनि अरविंद पोळे यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. शाम खुळे यांनी तर, आरोपीतर्फे ॲड. बसमुद्दीम काझी यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्यात कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा. प्रमोद गावले व मपोहवा अलका डेंगरे यांनी काम पाहिले.