राज्यात सर्वाधिक १६ हजार २९३ ब्रास वाळुची विक्री भंडाऱ्यात

Ø ऑनलाईन वाळू विक्रीला चांगला प्रतिसाद

Ø सर्वाधिक वाळू साठा भंडारा जिल्ह्यात

नागपूर :- नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन वाळू धोरण राबविण्यात येत असून वाळुची सर्वाधिक विक्री व नोंदणी भंडारा जिल्ह्यात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात २ हजार 736 नागरिकांनी २० हजार ब्रास वाळुसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यापैकी १६ हजार २९३ ब्रास वाळुची विक्री झाली आहे.

नवीन वाळू धोरणानुसार राज्यातील जनतेला आवश्यक असेलेल्या रेतीसाठी (वाळू) ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणीची सुविधा आहे. यानुसार 600 रुपये ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वाहतुकीसाठी सशुल्क सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकांना घरपोच वाळू मिळत आहे.

भंडारा जिल्ह्यात नोंदणी केलेल्या नागरिकांना सुलभपणे वाळू उपलब्ध व्हावी यासाठी चार वाळू विक्री केंद्र (डेपो) सुरु करण्यात आले आहेत. या केंद्रांवर ५३ हजार २० ब्रास वाळू उपलब्ध असून ४९ हजार २८० ब्रास वाळू ऑनलाईन नोंदणीसाठी उपलब्ध आहे.

भंडारा जिल्हयानंतर राज्यात सर्वाधिक ऑनलाईन नोंदणी अहमदनगर जिल्ह्यात झाली आहे. वाळुसाठी २ हजार २४५ नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यांना १५ हजार ८८५ ब्रास वाळू उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यात २५ हजार ९०६ ब्रास वाळू उपलब्ध असुन यापैकी २२ हजार २५ ब्रास वाळू ऑनलाईन नोंदणी धारकांसाठी आहे.

नागपूर जिल्ह्यात ११ केंद्रावरुन वाळू विक्रीची सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्यात ४८ हजार ९५० ब्रास वाळुसाठा उपलब्ध असून त्यापैकी ४६ हजार ४६४ ब्रास वाळू ऑनलाईन विक्रीसाठी आहे. ४४४ नागरिकांनी ३ हजार ०६८ ब्रास वाळुची ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी ५८२ ब्रास वाळू घरपोच उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

वर्धा जिल्ह्यातील ९५३ नागरिकांनी ६ हजार ६१८ ब्रास वाळुची ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी ३ हजार ५८२ ब्रास वाळू नागरिकांना उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात ७ डेपोमध्ये ४ हजार ३३१ ब्रास वाळुसाठा उपलब्ध आहे.

गोंदिया जिल्ह्यात ५ वाळू विक्री केंद्रावर २९ नागरिकांनी २७२ ब्रास वाळुसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ९८ हजार ७६६ ब्रास वाळुचा साठा असून त्यापैकी ऑनलाईन नोंदणीसाठी ९८ हजार ५४४ ब्रास वाळू विक्रीसाठी उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ३८ नागरिकांनी ३६५ ब्रास वाळुसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ३ हजार ६६० ब्रास वाळुसाठा असून ऑनलाईन नोंदणीसाठी ३ हजार ३४५ ब्रास वाळू उपलब्ध आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

1200 एकड़ सरकारी जमीन घोटाला पर जिलाधिकारी की चुप्पी ?

Wed Jun 14 , 2023
 – RTI में जवाब दिया जा रहा कि जाँच अभी जारी है,विडंबना नहीं तो और क्या हैं फिर भी राज्य सरकार पारदर्शी एवं न्यायप्रिय होने का दावा लगातार करती आ रही हैं नागपुर :- नागपुर जिले के उमरेड तहसील अंतर्गत मौजा पीटीचुवा ग्राम के आदिवासियों की जमीन फर्जी दस्तावेजों के आधार पर आधा दर्जन से अधिक धूर्त व्यवसाइयों ने अपने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com