वन विभाग नागपुर पथकास गंभीर जख्मी अजगर सापाला उपचारासाठी केले स्वाधिन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- सतरापुर येथे अजगर प्रजातीचा साप गंभीर जख्मी अवस्थेत असल्याच्या माहितीवरून वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान च्या सदस्यानी घटनास्थळी पोहचुन अजगर सापाची जख्मी गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता वन विभाग नागपुर च्या पथकाच्या स्वाधिन केले.

जिल्ह्यातील कन्हान येथे सतरापुर शिवारात एक अजगर प्रजातीचा साप अतिशय जख्मी अवस्थेत आढळुन आल्याने स्थानिक लोकांनी वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान (नागपुर) व वन विभागाला लगेच त्या सापाची माहिती दिली. असता संस्था सदस्य सर्पमित्र राम जामकर, अविनाश पास्पलवार, राजकुमार बावने, प्रीतम ठाकुर, विशाल इंगळे आदीने त्वरित पोहचुन सापाची स्थिती अतिशय गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी सापास ताबडतोब नागपुर वन विभागाच्या स्वाधिन सोपविले.

अश्या कुठल्याही प्रकारचे जख्मी साप किंवा घरातील आढळलेले साप, पक्षी कुठल्याही प्रकारचे वन्य प्राणी आढळल्यास त्यांना न मारता लगेच वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्थेला किंवा वन विभाला सुचना द्यावी. असे केल्यास प्राण्यांचे आणि लोकांचे रक्षण करण्यात येऊन दोघांना ही जीवनदान मिळेल अशी माहिती याप्रसंगी संस्था सदस्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फडणवीसांचा जपानमध्ये पाचवा दिवस सोनी, डेलॉईट आणि सुमिटोमोशी बैठका

Sat Aug 26 , 2023
– फिल्मसिटीसाठी सोनीला निमंत्रण, आयआयटी मुंबईशी संशोधन सहकार्य – तिसर्‍या मुंबईत बांधकाम संधींसाठी सुमिटोमोला निमंत्रण – जपान गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करणार टोकियो :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान भेटीच्या आजच्या शेवटच्या आणि पाचव्या दिवशी सोनी, डेलॉईट आणि सुमिटोमो कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्यासोबत सहकार्य करण्यास महाराष्ट्र इच्छूक असल्याचे सांगितले. सोनी समूहाला फिल्मसिटीत येण्याचे तसेच आयआयटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com