मुंबई :- ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून यंदा प्रथमच महाराष्ट्र राजभवन येथे ‘तेलंगणा राज्य स्थापना दिन’ साजरा केल्या जाणार आहे.
राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २ जून) संध्या. ५.३० वाजता तेलंगणा राज्य स्थापना दिनानिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. .
२ जून हा तेलंगणा राज्य स्थापना दिवस देशातील सर्व राजभवनांमध्ये साजरा केल्या जाणार आहे. दिनांक २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती.
राजभवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात ‘जय जय हे तेलंगणा’ नृत्य, ‘बथकम्मा’ व ‘बोनालू’ नृत्याचे सादरीकरण केले जाणार आहे.
देशातील सर्व राज्यांच्या सांस्कृतिक परंपरा याविषयी माहिती व्हावी हा आयोजनामागचा उद्देश आहे.
‘महाराष्ट्र राजभवन तसेच तेलंगणा शासन व फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (F – TAM) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.