यवतमाळ :- भारत देश युवकांचा देश आहे. पंतप्रधान मोदींनी युवकांसाठी अनेक योजना कार्यान्वीत केल्या. शिवाय महायुती युवा शक्तीला कायम पुरस्कृत करते. त्यामुळेच तरुणाईच्या मनावर महायुती सरकारचे गारूड राज्य करीत आहे. युवकांचा हा विश्वास आम्ही सार्थ ठरविणार असुन आगामी काळात विकास पर्व अधिक गतीमान होणार आहे. असा आशावाद महायुतीच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील महल्ले यांनी केले. त्या स्थानिक उत्सव मंगल कार्यालयात आयोजीत ‘कॉफि विथ युथ’ कार्यक्रमात बोलत होत्या.
भारत हा युवकांचा देश आहे. भारताच्या प्रगतीत युवकांचा मौलिक सहभाग देशाला महासत्ता बनविण्याच्या ध्येयात महत्वाची भुमिका बजावणार आहे. या निवडणुकीत तरुणाईचा मौलिक सहभाग आहे. या पार्श्वभुमीवर महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांनी काल दि. 12 एप्रिल रोजी स्थानिक उत्सव मंगल कार्यालयात तरूणाईशी संवाद साधला. ज्याला युवक युवतींनी भरभरुन प्रतिसाद दिला. यावेळी आ. मदन येरावार यांनीही तरुणांशी संवाद साधला. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभावी नितीमुळे आपला देश व्यापार, इंन्फ्रास्ट्रक्चर, ऑटोमाबाईल्स, इंडस्ट्रिज अशा एक नव्हेतर शेकडो क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहे. आज मोबाईल बनविण्यात भारताने विक्रम प्रस्तापित केला. स्टार्ट अप, मुळे नव्या उदयोजकांना नवी उर्मी मिळाली. लखपती दिदी सारख्या योजनेतुन महीला सक्षमीकरणला बळ मिळाले. जग भरातील निर्देशांकात अनिश्चितता पाहावयास मिळत असतांना भारतीय शेअर बाजारात उसळी पाहावयास मिळत आहे. तरुणांसाठी मोदीजींनी असंख्य योजना सुरु केल्या असुन त्यामुळेच युवकांना मोदींजींच्या नव्या भारत संकल्पनेचे अप्रुप असल्याचे येरावार यांनी सांगीतले. कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक नितिन भुतडा, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, युवासेना राज्य कार्यकारीनी सदस्य विशाल गणात्रा, भाजयुमो प्रदेश सचिव सुरज गुप्ता, आकाश धुरट, युवासेना जिल्हा प्रमुख महेश पवार, रोहीत राठोड, आकाश कुटेमाटे, सुमित खांदवे, आकाश चव्हाण, विलास कोल्हे, सौरभ तिवारी, सुरेश जैन, राम टेंभरे, जय चौधरी, शुभम सरकाळे, अश्विन तिवारी, युवती मोर्चाच्या विशाखा जोशी, आकाश कुटेमाटे, सौरभ तिवारी, तन्मय त्रिवेदी, अश्वजीत शेळके, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी तरुणाईने महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या विचाराने प्रभावित झालो असल्याचे एकमुखाने सांगीतले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या धोरनामुळे जगभरात भारतीयांचा मान सन्मान वाढीस लागल्याचे यावेळी तरुणांनी नमुद केले.