संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषदच्या तत्कालीन नगरसेवकांचा कार्यकाळ संपून दीड वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला अध्यक्ष असो वा नगरसेवकाच्या समोर माजी हा शब्द लागला परंतु अजूनही यातील बरेच तत्कालीन नगरसेवकाना पदावाचून करमेनासे झाले आहे आजही बहुतेकजण नगरसेवक म्हणूनच वावरत आहेत ज्यामुळे अनेक मावळले नागसेवक अजूनही नगरसेवकाच्या तोऱ्यात दिसून येतात.
कामठी नगर परिषदेत मावळत्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपून दीड वर्षापेक्षा अधिक काळ लोटला.नगरपरीषदेत सध्या प्रशासकराज आहे परंतू अजूनही निवडणुकीचा थांगपत्ता नाही त्यामुळे मावळत्या नगरसेवकासह नवख्यामध्येही निवडणुकीला घेवुन कुजबुज सुरू आहे.
चातकाप्रमाणे त्यांच्या नजरा निवडणुकीकडे खिळल्या आहेत. दीर्घकाळ प्रशासकराज असल्यामुळे नगर परिषदेचा कारभार वाऱ्यावर असल्यागत नाही.
फेब्रुवारी 2022 मध्ये येथील नगर परिषदेच्या तत्कालीन नगरसेवकांचा कार्यकाळ संपला.त्यानंतर प्रशासकराज सुरू झाला.प्रशासक राज संपुष्टात येऊन लवकरात लवकर निवडणुका लागतील असे मावळत्या नगरसेवकांना वाटले तसेही नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर साधारणता सहा महिन्यामध्ये निवडणूक होणे अपेक्षित असते.जुलै 2022 पासून नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीरही झाला मात्र मध्येच त्याला ब्रेक लागला.निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळे अजूनही नगर परिषद प्रशासकावरच चालत असून विकास मंदावला आहे.तथापि विकासाचा वेग वाढविण्यासाठी नागरिकांची कामे करण्यासाठी नगर परिषदेला लोकप्रतिनिधींची गरज आहे.तसा सूर मावळत्या नगरसेवकात आहे.
निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणारे नवखे उमेदवारही आपल्या मतदारसंघात जाऊन मतदारांचे मन वळविन्याचा प्रयत्न करीत आहेत.काही मावळते नगरसेवक केव्हाही निवडणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपल्या प्रभागात मतदाराच्या भेटीगाटी घेत आहेत.त्यांचा हा खटाटेप मतदारांचे मन वळविण्यासाठी असला तरी सरकार किंबहुना निवडणूक आयोग जोपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार नाही तोपर्यंत त्यांची प्रतीक्षा कायम असणार आहे.