भाजपाद्वारे महिलांना मोफत सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण उत्साहात संपन्न …

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अभिनव संकल्पना

नागपूर –   स्वप्न नितीन गडकरी यांच्या, मातृशक्तींच्या स्वस्थ आरोग्याचे!! हे वचनाची पूर्तता करताना भाजपा वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगर द्वारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पेनेतून साकारलेल्या  युवती आणि महिलांच्या निरामय,सुदृढ आरोग्यासाठी सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण शिबिराचा शुभारंभ राज्यसभा खासदार पद्मश्री  डॉ विकासजी महात्मे सर यांच्या शुभहस्ते डॉ महात्मे आय हॉस्पिटल, राजीव नगर येथे करण्यात आला. हा कार्यक्रमासाठी आमदार प्रवीण दटके यांचे  मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कॅन्सर एड असोसिएशन च्या संयोजिक डॉ धनंजया सारनाथ तर प्रमुख अतिथी म्हणून युवा मोर्चाच्या प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, रूपाताई रॉय,शहर महामंत्री  संजय बंगाळे,संघटनमंत्री  सुनिल मित्रा, किशोरजी वानखेडे, वर्षाताई ठाकरे, वर्षाताई चौधरी, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, वैद्यकीय आघाडी प्रदेश समन्वयक डॉ विंकी रुघवानी, डॉ सुनीता महात्मे,डॉ गिरीश चरडे,डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ कोमल काशीकर, रितेश रहाटे,मीनाक्षी तेलगोटेसोनाली कडू, पल्लवी श्यामकुळे, ज्योत्स्ना कुऱ्हेकर, वंदना शर्मा,डिंपी बजाज,निधी तेलगोटे,आदी पदाधिकारी व मातृशक्ती  उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा दीपप्रज्वलनानी शुभारंभ झाला व कॅन्सर एड असोसिएशन च्या डॉ धनंजया सरनाथ यांनी सरव्हायकल कॅन्सर विषयी मार्गदर्शन व लसीकरण विषयी माहिती दिली. या प्रसंगी डॉ विकासजी महात्मे यांनी युवती आणि महिलांना कॅन्सर लसीकरण घेऊन जनजागृती करण्याचे आव्हाहन केले. शिवानी दाणी यांनी महिलाशक्तीला ही लस निशुल्क दिल्याबद्दल नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केलेत.कार्यक्रमाच संचालन डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केलं तर आभार डॉ गिरीश चरडे यांनी मानलेत. या लसीकरण शिबिरासाठी स्वस्थवृत्त फॉउंडेशन च्या डॉ दीपिका चांदोक, डॉ जासलीन चांदोक, अभिषेक चावला, हर्षद जोशी तसेच डॉ महात्मे आय हॉस्पिटल चे पदाधिकारी चे सहकार्य लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अनुसूचित जातीजमाती प्रतिबंध कायद्यांतर्गत प्रकरणाची प्रलंबितता कमी करा - ज. मो. अभ्यंकर

Sat Jun 18 , 2022
ॲट्रासिटी कायद्याची जनजागृती करा नागपूर, दि. 17 : केंद्रीय आयोगानुसार प्रकरणाचा तपास योग्य रितीने व्हावा व प्रलंबितता कमी व्हावी यावर भर राहिला असल्याने फिर्यादीकडून योग्य माहिती घ्या. प्रकरणे तत्काळ सोडविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन निकाली काढा. त्याच बरोबर विशेष न्यायालयात प्रकरणे दाखल करा, अशा सूचना अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी आढावा घेतांना केल्या.  आयोगाचे सदस्य आर.डी. शिंदे, के. आर. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com