संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
-महापरित्राण पाठ व धम्मदेसनाचा मोठ्या प्रमाणात घेतला लाभ
कामठी ता प्र 16:- वैशाख बुद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे आयोजित कार्यक्रम मोठ्या प्रमाणात संपन्न झाले.वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित महापारित्रांन पाठ, महापरित्तदेसना घेण्यात आली.15 मे रोजी सायंकाळी 7 वाजेपासून मध्यरात्री पर्यंत पुज्यनिय भदंत महाथेरो बोधिरत्न, पूज्य भदंत मेत्तानंद,पूज्य भदंत नंदिता व इत्यादी पुज्यनिय भन्तेजिच्या उपस्थितीत महापारित्रांण पाठ व महापरित्तदेसना घेण्यात आली .महापारित्रांन पाठ दरम्यान पूज्य भिक्कु संघातर्फे आणण्यात आलेल्या तथागतांच्या अस्थी दर्शनार्थ ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे तात्पुरता ठेवण्यात आल्या होत्या.त्यामुळे संपूर्ण परिसर हा बुद्धमय झाल्याचा अनुभव उपस्थितांना घेता आला.
16 मे ला सकाळी 9 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना दीक्षा भूमीचे विश्वस्त सदस्य पूज्य भदंत नागदिपणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.याप्रसंगी पूज्य भन्ते नागदिपणकर यांना ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते कठीण चिवरदान व भोजनदान देण्यात आले.
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण भारत बौद्धमय करण्याच्या संकल्पनेला पूर्ण करण्याकरिता बुद्ध धम्माचा अष्टांग मार्ग आपल्या जीवनात आत्मसात करण्याचे व पंचशीलेचे पालन करण्याचे आव्हान ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी केले तसेच तथागतांचा शांती, मैत्री व मांनवकल्याणकारी विचार हा विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल मधून संपूर्ण जगात पोहोचेल असा विश्वास सुद्धा सुलेखाताईंनी व्यक्त केला.
याप्रसंगी कार्यक्रमात आमदार टेकचंद सावरकर, भीमराव फुसे, अजय कदम, दीपक सीरिया, उदास बन्सोड, सुभाष सोमकुवर, दिपंकर गणवीर,सावला सिंगाडे, विष्णू ठवरे,रवी रंगारी, ऍड सोनवणे,अंकुश बांबोर्डे, अनुभव पाटील,मनीष डोंगरे, रेखा पाटील,उषा भावे, इंदिरा खांडेकर,छाया गाडगे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश शंभरकर, चंदू कापसे,सुनील वानखेडे, सचिन नेवारे,सुशिल तायडे,अमोल नगरकर,भीमराव आळे,नरेश बावनकुळे, वंदना आळे, रेखा भावे,रजनी लिंगायत, शशिकला मेश्राम, वंदना कांबळे, पुष्पां गभने,संगीता मांनवटकर, किरण गायकवाड,मिता गजभिये, छाया वाठोरे,शालू सावतकर, सुमन घरडे, सुषमा नागदेवें,बेबी मेश्राम आदींनी अथक परिश्रम घेतले.
वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भेट देणाऱ्या अनुयायांनी एकच गर्दी केली होतो तर भेट देणाऱ्या या अनुयायाकरिता दादासाहेब कुंभारे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने शरबत व खीर वितरण करण्यात आले होते.