पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

-प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन

कामठी – चळवळीच्या माध्यमातून आपण पत्रकारांचे अनेक प्रश्न सोडविले. उर्वरीत प्रश्नांसाठी आपला संघर्ष सुरु आहे. पत्रकारांना न्याय हक्क मिळवून देणे हे आपले ध्येय आहे. पत्रकारांचे संघटन म्हणून आपण आज मराठी पत्रसृष्टीत प्रथम क्रमांकावर आहोत. बड्या वृत्तपत्रांचे धनदांडगे मालक व सरकार आपल्या विरोधात आहे, आपल्या संघटनेला चहुबाजुंनी कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, आपले फळांचे झाड आहे, त्या झाडाला बहर येऊ द्यायचा की वांझोटे ठेवायचे? याचा गंभिरपणे विचार करावा. पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून परिषदेच्या प्रसिद्धी विभागाने अधिक जागृत राहून परिषद करीत असलेले विधायक काम सक्षमपणे लोकांपर्यंत पोहचविले पाहिजे’’ असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम. देशमुख यांनी काल रात्री राज्यातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत मार्गदर्शन करतांना केले.

एस.एम. देशमुख पुढे म्हणाले, ‘‘विरोधकांच्या अपप्रचाराकडे लक्ष न देता आपले विधायक काम करीत राहणे हेच त्यांना चोख उत्तर आहे. परिषद पत्रकारांच्या हक्कासाठी ज्या जोमाने काम करते त्या प्रमाणात आपण प्रसिद्धी करण्यात कमी पडतो अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. परिषदेची चळवळ वाढावी म्हणून प्रत्येकाने रोज कमीत कमी परिषदेच्या कामासाठी दहा मिनिटे वेळ द्यावा व येत्या 7 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे होणाऱ्या आदर्श तालुका, जिल्हा पुरस्कार वितरण सोहळा मेळावा ताकदीने यशस्वी करण्याचे यावेळी एसएम देशमुख यांनी आवाहन केले.

मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, राज्यातील पत्रकारांना हक्क मिळवून देत चळवळ पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. राज्यातील पत्रकार प्रमुख संघटना म्हणून आपल्याकडे, परिषदेकडे पाहतात. पत्रकारांचे नेतृत्व करण्यात आपली संघटना राज्यात आघाडीवर आहे, संवाद ठेवा, काम करा, ठसा उमटवा, कामाची पद्धत बदलली तर नक्कीच परिषदेचे काम अजून जोमाने वाढू शकते. चळवळीतून पत्रकाराचे अनेक प्रश्न सोडविले, याचा आपल्याला अभिमान आहेच, उर्वरीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहू या असेही आवाहन किरण नाईक यांनी केले.

दोन तास चाललेल्या या ऑनलाईन बैठक़ीचे सूत्रसंचलन परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केले होते. बैठक़ीस राज्यभरातून तीसहून अधिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व पदाधिकारी यांनी आपला सहभाग नोंदवून संघटना वाढीबाबत चर्चेत आपला सहभाग नोंदविला व अधिक सक्रीय होण्याची हमी दिली.

या ऑनलाईन बैठकीत परिषदेचे सरचिटणीस हाजी मन्सूरभाई शेख, महिला आघाडीच्या राज्य संघटक शोभाताई जयपूरकर, उपाध्यक्ष जान्हवीताई पाटील, उपाध्यक्ष शिवराज काटकर, उपाध्यक्ष गो.पि. लांडगे, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, राज्य डिजिटल मिडीया प्रमुख अनिल वाघमारे, किशोर महाजन, बाळासाहेब ढसाळ, अमोल वैद्य, नारायण माने, मोहन चौकीदार, किशोर महाजन, संजय हंगे, राम साळुंके, संदीप कुळकर्णी, सुभाष राऊत, कमलेश ठाकूर, राजाभाऊ अदाते, विजय होलम, दिपक केतके, सुरेश नाईकवाडे, आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

NDCDA के चुनाव में CHEMIST SWABHIMAN PANEL एकतरफा जीत 

Mon Mar 20 , 2023
– राजीव उखरे अध्यक्ष तो संजय खोब्रागडे का सचिव बनना तय  नागपुर :- NDCDA का त्रय वार्षिक चुनाव हुआ.इस चुनाव में कैमिस्ट एकता और सुरक्षा का संकल्प लिए संकल्प पैनल का मुकाबला केमिस्ट स्वाभिमान पैनल से हुआ.कल रविवार को हुए मतदान पश्चात् देर रात परिणाम घोषित किये गए. जिसमें CHEMIST SWABHIMAN PANEL के सभी 4 उम्मीदवारों ने एकतरफा जीत दर्ज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com