गुंजेपारमध्ये जिल्हाधिका-यांनी केली मतदार पडताळणी

– आजपासून घरोघरी बीएलओव्दारे मतदार पडताळणी

भंडारा :- विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत पूर्व –पुनरीक्षण उपक्रमामध्ये आजपासून ते 21 ऑगस्ट या महीन्याभराच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे घरोघरी जावून मतदार यादी तपासून घेत आहेत.त्यामध्ये नवमतदारांची नोंदणी तसेच मयत व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदाराबाबत संबंधिताकडून फॉर्म न.7 भरून घेण्याची प्रक्रीया करत आहेत.

आज गुंजेपार येथे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी याबाबतीत चंद्रशेखर बांते यांच्या घरी जाऊन मतदारांची पडताळणी करत असलेल्या प्रक्रीयेची माहिती घेतली.यावेळी भंडारा तहसीलदार सोनकुसरे,तसेच तलाठी गणेश काळे,सुषमा ईडपाते तसेच बीएलओ भांडारकर यांनी आयोगाच्या निर्देशानूसार मतदार पडताळणीचे काम सुरू असल्याचे सांगितले.मयत व्यक्तींच्या नावांची यादी ग्रामसेवकांनी बीएलओना उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिका-यांनी केली.

खुर्शीपारमध्ये येथील मतदार पडताळणीचे काम तहसीलदार सोनकुसरे यांनी घरोघरी जावून केले.तेथील नागरिकांच्या घरी जावून मतदारांची नावे मतदार यादीत असल्याची पडताळणी त्यांनी केली.या उपक्रमामुळे जिल्हयातील मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे आणि अद्ययावतीकरणाचे काम सुलभ होऊ शकणार आहे. हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये, याची सुनिश्चिती करण्याची नागरिकांसाठी मोठी संधी आहे. त्यामुळे जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपले स्वतःचे, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घेण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

आज भंडारा जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार तसेच गावपातळीवरील यंत्रणांनी या मतदार पडताळणी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरूवात केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाज्योतीच्या युपीएससी प्रवेश परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी नियमानुसार कारवाई

Sat Jul 22 , 2023
नागपूर :-  महाज्योती मार्फत UPSC पूर्व प्रशिक्षणासाठी दि.16 जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रवेश परीक्षा घेण्यात आली. महाज्योती मार्फत विविध प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यासाठी एजन्सी निवडण्याकरीता ई-निविदा प्रक्रिया करण्यात आलेली होती. निविदा प्रक्रियेतून परीक्षा घेणारी एजन्सी नियुक्त करण्यात आली. सदर एजन्सी मार्फत महाज्योती करीता UPSC पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी दि. 16 जुलै रोजी परीक्षा आयोजीत केलेली होती. या परीक्षेसाठी 20 हजार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!