आपली बसच्या ड्रायव्हर, कंडक्टर हया कर्मचा-यांचे लाल बावटा वाहतूक कामगार युनियन (महाराष्ट्र) सिटूच्या नेतृत्वात धरणे आंदोलन यशस्वी

नागपूर :- नागपूर महानगर पालीकेच्या अंतर्गत चालणा-या आपली बस शहर वाहतूक मधील ड्रायव्हर, कंडक्टर हे कर्मचारी लाल बावटा वाहतूक कामगार युनियन (महाराष्ट्र) सिटूच्या अंतर्गत संघटीत झाले आहेत व हे सर्व कर्मचारी विविध कंत्राटदारी पध्दतीवर आपली बस मध्ये कार्य करतात, हया कर्मचा-यांचे भरपूर प्रश्न आहेत व त्यांना कामगार कायद्यातील सोई सवलती सुध्दा देण्यात येत नाही आपली बसचे दिवसाचे जवळपास ३० लाख रुपये उत्पन्न आहे. हया कर्मचा-यांना वेतन अतिशय तटपुंजे आहे जेव्हा कि कचरा उचलणा-या ड्रायव्हर व कर्मचारी हयांना २०१५ प्रमाणे किमान वेतन देण्यात येते. राज्य शासनाने २०२४ करीता पण सुधारित वेतन लागु केले आहे परंतु आपली बस मध्ये कार्यरत ड्रायव्हर, कंडक्टर हयांना अजुन पर्यन्त २०१५ तसेच २०२४ चे वेतन लागु केलेले नाही, त्याचप्रमाणे कंडक्टर जे कार्य करतात हया कंडक्टरला विनाटिकीट प्रवासी बाबत फाईन म्हणून रुपये २००० दंड आकारण्यात येतो व हया कर्मचा-यांना १५-२० दिवस कामावरुन काढून टाकण्याची बेकायदेशीर व जुलमी पध्दत राबविण्यात येते तसेच युपीआय व्दारे प्रवाश्यांकडून भाडे न घेतल्याबाबत पण जबरी दंड आकारण्यात येतो महिला कर्मचा-यां करीता डेपोवर स्वच्छतागृहांची सोय नाही बस स्थानकांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुध्दा नाही हया बाबत मनपासोबत दोन वेळा चर्चा करुन देखिल अजुनपर्यन्त हया सोई सुविधा त्यांना मिळालेल्या नाहीत, नाशिक व पुणे हया धर्तीवर हया कर्मचा-यांना ठेकेदारी पध्दत रथ करण्यात येतून हयांना नागपूर मनपाचे कर्मचारी म्हणून सामावून घेण्यात आलेले नाही.

१. आपली बस कर्मचा-यांना २०१५ व २०२४ प्रमाणे किमान वेतन दर लागु करा

२. औद्योगिक विवाद कायद्याप्रमाणे “तकार निवारण समिती” करण्यात यावी.

३. कंडक्टर वरील कामावरुन घरी बसवण्याच्या तसेच फाईन वसून करण्याची पध्दत बंद करा.

४. युनिटी कंपनीने वाहकांना ग्रॅच्युटीचे भुगतान ताबडतोबीने करण्यात यावी.

हया वरील मागण्यां करीता दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ ला संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले व हया मागण्यांवर सकारात्मक तोडगा न निघाल्यास दिनांक ४ ऑक्टोंबर, २०२४ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येईल. हया धरणा कार्यक्रमात कॉ. दिलीप देशपांडे, सिटू महासचिव व अध्यक्ष लाल बावटा वाहतूक कामगार युनियन, कॉ. गुरुप्रित सिंह, उपाध्यक्ष, कॉ अनिस सिरक्रिया, सचिव आपली बस युनिट, कॉ. रणदिवे, कोषाध्यक्ष, कॉ. सचिन गुडे, कार्यकारी सदस्य, कॉ, रितेश रामटेके, अमित गेडाम, वैभव सहारे, पितांबर डोकरिमारे, मिहिर माने, विजय ठाकरे आदीनी हया कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले, धरणा आंदोलनाला कॉ. अरुण लाटकर नेते किसान सभा व आदिवासी हक्क संघर्ष समिती हयांनी संबोधित केले. आमदार अनिल देशमुख, आमदार सुनिल केदार, नगरसेविका अवंतिका लेकुरवाळे, माजी आमदार तथा शिक्षक सुधाकर कोहळे हयांनी संबोधित केले व आंदोलनास समर्थन जाहिर केले, कार्यक्रमात ५०० चे वर कर्मचारी सागील होते कार्यक्रमा आधी संविधान चौकात शहिद भगतसिंह हयांच्या प्रतिमेस पुषहार घालून कार्यक्रम करण्यात आला कॉ अरुण लाटकर नेते किसान सभा व आदिवासी हक्क संघर्ष समिती हयांनी संबोधित केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माझी वसुंधरामध्ये बेला ग्रामपंचायत राज्यात व्दितीय

Sun Sep 29 , 2024
– १.२५ कोटी मिळणार पुरस्कार भंडारा :- महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत राज्यस्तरावरील व्दितीय पुरस्कार ग्रामपंचायत बेला यांना जाहीर झाला. पुरस्कार रक्कम रुपये १.२५ कोटी आहे. सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षातील माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत बेला ग्रामपंचायतीने अभियानात भाग घेतला होता. अभियानातील सर्व निकषावर बेला पंचायतीने वर्ष भर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com