राय टाऊन लोकमान्य नगर येथे हिंदू राष्ट्र जागृती सभा उत्साहात संपन्न !
नागपूर :- येथील राय टाऊन, लोकमान्य नगर, हिंगणा रोड, नागपूर येथे दास नवमीच्या शुभ दिनी हिंदू राष्ट्र जागृती सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. राय टाऊन आणि आसपासच्या परिसरातील 350 हून अधिक राष्ट्रप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते. रायटाऊन गाळेधारक सोसायटीच्या प्रांगणात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रणरागिणी शाखेच्या गौरी जोशी यांनी लव जिहादच्या संकटाची गंभीरता आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केली. केवळ हिंदू महिलाच नाही तर अन्य पंथीय महिला मुलीही लव जिहादला बळी पडत आहेत, सर्वसामान्य महिलांपासून उच्चशिक्षित महिलांपर्यंत सर्व सर्वांना याचा धोका असून लव जिहाद विरोधी सक्षम कायद्याची एकमुखी मागणी करावी असे आवाहन त्यांनी केले. त्यासोबतच स्वतः धर्म शिक्षण घेणे आणि स्वसंरक्षण शिकून या धर्मांध नराधमांना धडा शिकवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
सभेचे प्रमुख वक्ते हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी देव, देश, धर्म, राष्ट्र, हिंदू समाज यांवर चहूबाजूंनी होणाऱ्या विविध संकटांविषयी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्र व धर्म संकटात असताना आपण, आपले कुटुंब, आपल्या माता भगिनी सुरक्षित राहू शकत नाही त्यासाठी आदर्श, बलशाली असे सत्वगुणी लोकांचे हिंदू राष्ट्र स्थापन करण्या वाचून पर्याय नाही असे प्रतिपादन त्यांनी केले, कालमहिमेनुसार व संतांच्या संकल्पाने लवकरच हिंदू राष्ट्र स्थापन होणार आहे मात्र यासाठी तन-मन-धनाने या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्यांच्या आवाहनाला उपस्थित धर्मप्रेमी नागरिकांनी हात उंचावून व ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम’ अशा घोषणा देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी राष्ट्र, धर्म, मंदिरे, हिंदू परंपरा, माता भगिनी यांच्या रक्षणासाठी काही ठराव मांडण्यात आले त्यालाही उपस्थित त्यांनी उत्स्फूर्त संमती दर्शवली. उपस्थित नागरिकांनी राष्ट्र व धर्म रक्षणासाठी कार्यरत राहण्याची प्रतिज्ञा ही घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत पोलके यांनी केले. कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आसपासच्या परिसरातून अशाप्रकारे सभा घेण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली. साप्ताहिक धर्मशिक्षण वर्ग व संरक्षण प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची मागणी ही नागरिकांकडून करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्र व धर्म विषयक जागृती करणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते तसेच राष्ट्रधर्म विषयक व अध्यात्मविषयक ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. रायटाऊन गाळेधारक सोसायटीचे अध्यक्ष श्री अनिल शर्मा यांच्या पाठिंब्याने व सहकार्याने ही हिंदू राष्ट्र जागृती सभा उत्साहात पार पडली.